• Latest
  • Trending

महाराष्ट्रात कॉग्रेसचं जबरदस्त कमबॅक..

June 5, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

महाराष्ट्रात कॉग्रेसचं जबरदस्त कमबॅक..

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

13 जागा जिंकत राज्यात बनला नंबर एकचा पक्ष

नाशिक :लोकसभा निवडणुका घोषित झाल्या आणि चर्चा सुरू झाल्या भाजपाला किती जागा मिळतील, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष फुटले आणि चिन्ह पण गेले मग दोघे निवडणुकीत टिकाव धरणार का ? शिवसेनेतून फुटलेल्या शिवसेनेला व राष्ट्रवादीतुन फुटलेल्या अजित पवार गटाला मतदार स्विकारतील का ? याच चर्चा मीडियात व सामान्य नागरिकांमध्ये सुरू होत्या. मात्र फार चर्चेत नसलेल्या राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाने ज्यावेळी महाराष्ट्रात मुसंडी मारली त्यावेळी प्रत्येकाच्या तोंडी कॉग्रेस आणि इतक्या जागा हीच चर्चा होती. 2019 च्या लोकसभेचा विचार करता महाराष्ट्रात कॉग्रेसला अवघी एकच जागा मिळाली होती. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटांच्या जागांची बेरीज जरी केली तरी 2019 च्या तुलनेत कमी झालेली दिसते याउलट कॉग्रेसच्या महाराष्ट्रात जागांची संख्या तब्बल 12 पटीने वाढली हे विशेष आणि कॉग्रेस  ने ज्या पद्धतीने कमबॅक केला ते आश्चर्यकारक वाटते. यावरून एक लक्षात येते की कितीही वादळ-वारे येऊ देत कॉग्रेसने आपली पाळेमुळे महाराष्ट्रात अगदी घट्ट रोवली आहेत. मुख्य म्हणजे एकमेकांना पाण्यात पाहणारी शिवसेना व कॉग्रेस आज चक्क एकत्र येऊन लागलेल्या निकालाची फळे चाखत आहेत. यातील विशेष गोष्ट म्हणजे ज्यावेळी शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आली त्यावेळी ही वेगवेगळ्या विचारधारेची पक्ष आपापल्या मतपेढ्याचा लाभ एकमेकांना पोहचवतील का ? किंवा कॉग्रेसला मानणारा वर्ग शिवसेनेला अथवा शिवसेनेला मानणारा वर्ग कॉग्रेसला मतदान करेल का या विषयावर राजकिय अभ्यासकांची जोरदार चर्चा झाली .मात्र यावर स्पष्ट कोणीही बोलू शकले नाही. निकालानंतर हे दिसून आलं की शिवसेना व कॉग्रेस आपापल्या मतपेढ्याचा लाभ पोहचवण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वीच झाले नाही तर एकमेकांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यानी देखील जीवाचे रान केले.  यादरम्यान कॉग्रेसला अनेक मोठ्या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली. अशोकराव चव्हाण जे माजी मुख्यमंत्री होते त्यांनादेखील ऐनवेळी पंजा सोडत कमळ हाती घेतले. मुंबईतील अनेक नेते-मंडळी यांनी कॉग्रेसला बाय-बाय केलं अशी अवस्था कॉग्रेसची महाराष्ट्रात होती.  राज्यात प्रभाव पाडू शकेल असा कुठलाही मोठा नेता नसताना .कॉग्रेसने महाराष्ट्रात मोठी मुसंडी मारली आणि आज महाराष्ट्रात खासदारांच्या संख्येच्या बाबतीत क्रमांक एकच पक्ष झाला हे विशेष,महाराष्ट्रात महाआघाडीत कॉग्रेसच्या वाट्याला 17 जागा आल्या होत्या. त्यापैकी 13 जागांवर कॉग्रेसने घवघवीत यश मिळविले. डॉ शोभा बच्छाव (धुळे) वर्षा गायकवाड (मुंबई उत्तर-मध्य) प्रणिती शिंदे(सोलापूर) शाहु महाराज (कोल्हापूर) गोवाल पाडवी (नंदुरबार) प्रतिभा धानोरकर (चंद्रपूर) बळवंत वानखेडे(अमरावती) श्यामकुमार बर्वे (रामटेक) डॉ नामदेव किरसान (गडचिरोली-चिमूर) डॉ प्रशांत पडोळे(भंडारा-गोंदिया) डॉ कल्याण काळे (जालना) शिवाजी काळगे(लातूर) वसंत चव्हाण (नांदेड)

Loading

Previous Post

नाशकात “असली” शिवसेनेचाच आवाज घुमणार, नाशिककरांचा शिक्कामोर्तब

Next Post

देशात एकट्या भाजपने जिंकल्या 240 जागा तर कॉग्रेसने 99

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White