• Latest
  • Trending
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

मीच पीडितेला घरी नेऊन नमाजचे प्रशिक्षण दिले

नाशिक : देशभरात खळबळ उडवून देणार्‍या TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाला आता नवं वळण मिळाल्याचे चित्र असून या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर चौकशीमध्ये तिने अनेक खळबळजनक खुलासे केले आहे. निदा खानने ‘हो, मीच नमाजचे ट्रेनिंग दिले!’ अशी कबुली दिली आहे. पोलीस चौकशीमध्ये निदाने मान्य केले आहे की तीच पीडितेला आपल्या घरी नेऊन नमाज पढण करायला शिकवत असे. पोलिसांना मोबाईलमधून ३७ इस्लामिक ऑडिओ क्लिप्स आणि ॲप्स सापडले आहेत, जे पीडितेच्या फोनमध्ये जबरदस्तीने इन्स्टॉल करण्यात आले होते. आरोपींनी पोलीस तपासात हेही उघड केले आहे की, TCS कार्यालयाच्या ७ व्या मजल्यावरील कॅफे या कटाचा मुख्य अड्डा होता. इथेच बसून दानिश, निदा आणि तौसीफ पीडितेच्या धर्मांतराचा संपूर्ण कट रचत असत.नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात पीडितेने पोलिसांना दिलेल्या अधिकृत जबाबात आणखी एक दावा केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी तौसीफ अत्तारने तिच्या वैयक्तिक परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत तिला म्हटले होते की, “तुला मूल होत नाहीये, मी तुला अजमेरच्या एका मौलवीचा मोबाईल नंबर देतो. तिथे जाऊन आल्यावर तुला गॅरंटीने मूल होईल.” पोलीस आता या अजमेर अँगल आणि मौलवीच्या कनेक्शनचाही सखोल तपास करत आहेत. निदा खान स्वतः पोलीस पथकाला आपल्या घरी घेऊन गेली आणि तिने ती खोली व तो कोपराही दाखवला, जिथे ती पीडितेला बोलावून नमाज पढणाचे रीतसर प्रशिक्षण देत असे.पोलिसांना या प्रकरणात भक्कम डिजिटल आणि तांत्रिक पुरावे हाती लागले आहेत. पीडितेच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीदरम्यान इस्लाम धर्माशी संबंधित एकूण ३७ ऑडिओ क्लिप्स जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय, मोबाईलमध्ये अनेक यूट्यूब लिंक्स आणि मुस्लिम धर्माशी संबंधित ४ विशेष मोबाईल ॲप्सही आढळले आहेत. पोलीस तपासात हे स्पष्ट झाले आहे की, हे सर्व ॲप्स आरोपी दानिश आणि निदा यांच्या सांगण्यावरूनच पीडितेच्या फोनमध्ये इन्स्टॉल करण्यात आले होते.निदा खानच्या या थेट कबुलीमुळे हे प्रकरण केवळ लैंगिक छळापुरते मर्यादित नसून, यामागे एक मोठे संघटित धर्मांतर रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीडित तरुणीवर नेमका कसा दबाव आणला गेला? या कटात कंपनीतील किंवा बाहेरील आणखी किती लोकांचा सहभाग आहे? याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.

Loading

Previous Post

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

Next Post

मनधरणीमुळे माघार घेतली की? दबावाचं राजकारण झालं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White