• Latest
  • Trending
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
धक्कादायक ! नाशिकमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार

धक्कादायक ! नाशिकमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार

October 18, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
News Black & White
Monday, October 19, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

YOU MAY ALSO LIKE

धक्कादायक ! नाशिकमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

तर मी जाहीर माफी मागायला तयार

नाशिक  :  मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून काल ओझर विमानतळ परिसरात गोकुळ गीते यांच्याबरोबर मंत्री गिरीश महाजन,उदय सामंत,दादा  भुसे यांनी चर्चा केली. मात्र तरीदेखील गोकुळ गीते हे निवडणूक लढण्यावर ठाम राहिले. त्यानंतर मात्र आज महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनी गणेश गिते यांच्या घरी जाऊन बंद दाराआड चर्चा केली. गणेश गीते आणि किशोर दराडे या दोघांमध्ये साधारण तासाभरापासून अधिक काळ बंद दाराआड खलबतं सुरू होती. यानंतर किशोर दराडे यांनी मीडिया  बरोबर संवाद साधला.यावेळी ते म्हणाले दिपालीताई गीते या आमच्या मतदार आहेत. मी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी त्यांच्याकडे मत मागण्यासाठी आलो होतो. त्यांनी मला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, त्या युतीचा धर्म पाळणार असून महायुतीसोबतच राहतील. गणेश भाऊ देखील निवडणुकीच्या स्पर्धेत होते आणि उमेदवारी मागत होते. ही जागा भाजपला जाणार की शिवसेनेला, हे आधी स्पष्ट नव्हते. आता नियमाने ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली असल्याने आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे.त्याचबरोबर गोकुळ गिते हे माझे छोटे भाऊ आहेत. मी त्यांचीही भेट घेणार असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मदत करावी, अशी विनंती त्यांना करणार आहे. शेवटी पाठिंबा देण्याचा निर्णय ते स्वतः घेतील, असेही किशोर दराडे यांनी म्हटले. वादग्रस्त व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपवर  प्रतिक्रिया  काही दिवसांत व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपवर किशोर दराडे यांनी  बाजू मांडली. या व्हिडीओबाबत बोलताना ते म्हणाले, मराठी भाषा ही जशी वाकवू तशी वाकते. मी ते सहज बोललो होतो, आमचे ट्युनिंग तसे आहे. पण कोणीतरी अनवधानाने ते व्हायरल केले. यात गोकुळ गिते यांचा काहीही संबंध नाही. राजकारणात कोणीतरी विरोधक असतात, जे आपसात लावून देण्याचे काम करतात. माझा पुतण्या सुशिक्षित आहे, तो असे बोललेला नाही. त्याने माध्यमांना आधीच स्पष्ट केले आहे की, ती क्लिप फॉरेन्सिक लॅबला पाठवा. जर तो माझा किंवा आमच्या घरातील कोणाचा आवाज असेल आणि आमच्याकडून काही चूक झाली असेल, तर मी जाहीर माफी मागायला तयार आहे,” असे दराडे यांनी म्हटले.

Loading

Previous Post

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

Next Post

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White