• Latest
  • Trending
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
स्वीकृत साठी भाजपमधून 300 नावे वरिष्ठांकडे

स्वीकृत साठी भाजपमधून 300 नावे वरिष्ठांकडे

October 6, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

धार्मिक विधी आणि मंत्रोच्चाराच्या घोषात राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन करण्यात आले. 

नाशिक : (ब्लॅक अँड व्हाईट वृत्तसेवा) आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीतील कुशावर्त तीर्थ येथे ३१ फूट उंच भव्य सिंहस्थ ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभाचे पूजन आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या ध्वजस्तंभामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे.राष्ट्रपती महोदयांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरही संबंधित यंत्रणांनी आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री महाजन यांनी यावेळी केले. या ध्वजस्तंभाची रचना आकर्षक पद्धतीने करण्यात आली असून, स्टीलच्या पाईपवर ६२ किलो पितळाचा मुलामा देण्यात आला आहे. त्यामुळे ध्वजस्तंभाला भव्य आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे. कुशावर्त तीर्थाच्या धार्मिक महत्त्वाला साजेशी कलाकुसर या ध्वजस्तंभात करण्यात आली आहे. ध्वजस्तंभावर समुद्रमंथनातील चौदा रत्नांचे चित्रण, अमृतकलश धारण केलेल्या गरुडाची प्रतिमा तसेच गणेशाच्या प्रतिमांचा समावेश करण्यात आला आहे. या धार्मिक प्रतीकांमुळे ध्वजस्तंभाला विशेष सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.कुंभमेळा ध्वजस्तंभ प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त तीर्थ परिसरात विशेष व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुशावर्तच्या पाठीमागील बाजूच्या छोट्या पश्चिम दरवाजातून मंत्री महाजन आणि मान्यवरांचे आगमन झाले.या पूजन सोहळ्यास आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष पल्लवी शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, सहायक धर्मदाय आयुक्त विवेक सोनुने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी सानप,
मुख्याधिकारी गोविंद जाधव, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, नाशिक पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध आखाड्यांचे प्रमुख, साधू, संत, महंत, भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

Previous Post

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

Next Post

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White