• Latest
  • Trending
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
स्वीकृत साठी भाजपमधून 300 नावे वरिष्ठांकडे

स्वीकृत साठी भाजपमधून 300 नावे वरिष्ठांकडे

October 6, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

“हे आपलेच लोक आहेत, त्यांच्यापासून इतके अंतर ठेवल्यामुळे त्यांच्या डोळ्यांमधील आनंद आपल्याला पाहता येत नाही.

नाशिक : मध्ये आज पार पडलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षेच्या अति-नियोजनावरून स्थानिक पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. शहरातील पंचवटी परिसरातील युथ फेस्टिवल मैदानात आयोजित राज्यस्तरीय सरपंच परिषदेला राज्यातील अनेक ठिकाणाहून सरपंच,ग्रामसेवक, ग्राम पंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांचे दोन तास उशिराने आगमन झाले यादरम्यान सर्वच कंटाळलेले असताना अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातून मोर्चा पोलिसांकडे वळविला आणि त्यानंतर कंटाळले सर्वच सुखावले. फडणवीस म्हणाले, “भाषण करत असताना एक तक्रारही मला करायची आहे. ही तक्रार या अभियानाशी संबधित नाही. पण, पोलिस विभागाला मला तक्रार करायची आहे. सुरक्षेचे कारण असेल, परंतु आपल्यात आणि समोर बसलेल्या उपस्थितांमध्ये एक क्रिकेटचे मैदान बसेल इतके अंतर ठेवण्यात आले आहे. इतकं दूर सगळ्या लोकांना बसवलं आहे, की त्यांच्या नजरेत नजर घालून मला त्याचं अभिनंदन करता येत नाही अशी खंत फडणवीसांनी व्यक्त केली.यापुढे पोलिसांनी इतके अंतर राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवावी अशी जाहीर सूचना भर कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. तुम्हाला देखील सुरक्षेचे काही नियम पाळावे लागतात. पंरतु लोक मोठी मेहनत करुन इथपर्यंत येतात. ते आमचे लोक आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना आमच्यापासून इतके दूर बसवू नका, त्यांना आमच्या जवळ बसण्याची संधी यापुढे प्रत्येक कार्यक्रमात द्यावी अशा सूचना त्यांनी पोलिस विभागाला केल्या. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ उपस्थित होते.

Loading

Previous Post

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

Next Post

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White