शहरातील पिनॅकल मॉल जवळ घडली घटना एक जण गंभीर जखमी

नाशिक : ( ब्लॅक अँड व्हाईट वृत्तसेवा) शहरातील कायद्याच्या बालेकिल्लाला पुन्हा गाव गुंडांनी ठेंगा दाखवण्यास सुरुवात केली असून त्रंबक नाका येथील पिनॅकल मॉल समोर अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी चार ते पाच जणांच्या टोळक्याने दोघा रिक्षा चालकांवर कोणत्या सह पेवर ब्लॉकने हल्ला केल्याने यात एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रिक्षाचालक प्रेम सिंग आनंद हिरे आणि रोहित विलास पाटील हे दोघे उभे असताना अचानक चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर कोयत्यासह पेवर ब्लॉकने हल्ला केला. यादरम्यान हल्लेखोर घटनास्थळापासून पसार झाले. गंभीर जखमी झालेला युवक रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. सोबतच्या रिक्षा चालकांनी दोघांना पाहिले आणि जवळच असलेल्या सामान्य रुग्णालयात नेले. पूर्व वैमन्याशातून हल्ला झाल्याचा अंदाज सहायक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ यांनी व्यक्त केला असून दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे तर रोहित याच्याही डोक्याला इजा पोहोचली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तातडीने रवाना करण्यात आली आहेत. दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे .दरम्यान जखमींना दवाखान्यात नेले तेव्हा रिक्षा चालकांची मोठी गर्दी जमा झाली होती. जखमी दोघेही ठक्कर बस स्थानक परिसरात रिक्षा लावत असत ते नुकतेच थांब्यावर आले होते. याचवेळी त्यांच्यावर टोळक्याने हल्ला केला. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पिनॅकल मॉल समोर रिक्षा लावण्यावरून नेहमीच वाद होत असतात. याच कारणाने दोघांवर हल्ला झाला असण्याची दाट शक्यता पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी व्यक्त केली. जवळील सीसीटीव्ही फुटेची तपासणी करण्यात येत असून हल्लेखोर एकाच रिक्षातून पसार झाले. या प्रकरणी दोन गटात मागच्या काळातही वाद झाले ते माहिती समोर आली असून त्यातून हा हल्ला झाला असावा यामध्ये हल्ला करण्यात आलेला प्रेमसिंग हिरे आणि रोहित पाटील हे दोघे मित्र असून रिक्षाचालक म्हणून काम करतात. प्रेमसिंगा आयटीआयचे शिक्षण घेत असून शिक्षणासोबत रिक्षा चालक म्हणूनही काम करतो. त्याचे वडील सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे सायंकाळी कॉलेज म्हणून आल्यावर वडिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी तो रिक्षा चालून दोन पैसे कमवत असल्याचे त्याचे वडील म्हणाले.


![]()












