• Latest
  • Trending
अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

February 9, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

YOU MAY ALSO LIKE

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

नाशकात भाजपमध्ये अजून काही धक्कादायक निर्णय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून गैरसमज दूर केल्याची तिदमे यांची माहिती

नाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदाच्या निवडीवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठे वादळ निर्माण झाले होते मात्र हे वादळ अखेर शांत झाले असून शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी राजीनामा देण्याची घोषणा करून ‘नॉट रिचेबल’ झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र,आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रविण तिदमे यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या दरम्यान बोलताना प्रविण तिदमे म्हणाले की, “मी स्वतः नाराज होऊन नॉट रिचेबल झालो नव्हतो. तर उपमहापौरपदाची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. त्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. सतत फोन, घराबाहेर गर्दी आणि ‘आपले नेमके काय चुकले?’ असे प्रश्न सुरू होते. या भावनांचा आदर म्हणून काही काळ मी नॉट रिचेबल झालो होतो.या काळात विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी तिदमे यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत राजीनामा न देण्याच्या सूचना केल्या.तिदमे यांच्याशी संपर्क होत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. “स्वतः एकनाथ शिंदे यांनी ‘बंटीवर अन्याय होणार नाही. त्याला तातडीने माझ्याशी संपर्क साधायला सांगा,’ असा निरोप कुटुंबियांना दिला,” असे तिदमे यांनी सांगितले. त्यानंतर रविवारी आणि सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, खासदार नरेश म्हस्के, आमदार सुहास कांदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मशीलकर,संपर्कप्रमुख राम रेपाळे यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने उपमहापौरपदाबाबतचे लेखी पत्र वेळेत नाशिकला पाठवले जाऊ शकले नाही. मात्र तुझ्यावर किंवा इतर नगरसेवकांवर कोणताही अन्याय होणार नाही. मला भेटल्याशिवाय चुकीचा निर्णय घेऊ नकोस.” या आश्वासनानंतरच राजीनामा न देण्याचा निर्णय घेतल्याचे तिदमे यांनी सांगितले. तसेच मला आणि इतर सर्व नगरसेवकांना मंगळवारी मुंबईत भेटीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार आणि जनभावनेचा आदर राखत मी महानगरप्रमुख पदाचा तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले

Loading

Previous Post

तिदमे नॉट रिचेबल, समर्थकांची गर्दी

Next Post

फिजिक्सवाला प्रकरण आणि नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White