• Latest
  • Trending
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
“कॉकरोज” वादात, 50% फॉलोवर्स पाकिस्तानी बांगलादेशी

“कॉकरोज” वादात, 50% फॉलोवर्स पाकिस्तानी बांगलादेशी

May 22, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

YOU MAY ALSO LIKE

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

शिंदे गटाच्या शिवसेनेची मोठी खेळी

नाशिक : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतील संघर्ष उफाळून आला असून याला कारण नाशिक आणि जळगाव ठरले असून भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना दोन्हीही एकमेकांचा हिशोब चुकता करण्याची अप्रत्यक्ष भाषा करत आहेत. नाशकात महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वाट्याला आली असून शिंदे गटाचे नरेंद्र दराडे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र भाजपचे नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते व भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने नरेंद्र दराडे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची वाट अवघड झाली आहे. त्यामुळे महायुतीत असून देखील भाजप सहकार्य करत नसल्याची भावना पदाधिकाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे जळगाव येथील विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये भाजपला सुटल्याने तेथे भाजपचे नंदकिशोर महाजन हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत मात्र याठिकाणी  शिंदे गटाच्या शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांची वाट अवघड केली आहे. जळगाव आणि नाशिक या  दोन्ही ठिकाणी महायुतीतील वरीष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून देखील या दोन्ही ठिकाणी बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने नाशकात शिंदे गटाच्या शिवसेनेचे तर जळगाव मध्ये भाजपचे टेन्शन वाढले आहे. जळगाव मध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांचाच डाव राजकीय क्षेत्रात सुरू असलेल्या चर्चेनुसार जळगावमध्ये भाजपला अडचणीत आणण्याचा डाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाच असल्याची चर्चा असून गुलाबराव पाटील यांच्या अप्रत्यक्ष पाठिंब्या शिवाय रेश्मा काळे इतक्या ठामपणे आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवू शकत नसल्याची चर्चा आहे त्यामुळे नाशकात जे घडले त्याला उत्तर जळगाव मध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने दिले असून नाशिक मध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार दराडे यांना भाजपच्या बंडखोरांनी जाहीर पाठिंबा द्यावा त्यानंतरच जळगाव मध्ये भाजपच्या वाटेत असलेल्या अडचणी दूर करू असा एक प्रकारचा संदेशच शिंदे गटाच्या शिवसेनेने जळगाव मध्ये दिला असून यामुळे महायुती तणाव निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यामधून कसा मार्ग काढतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार निर्णय घेण्यात येईल असे जरी पत्रकार परिषद सांगितले तरी याचा अप्रत्यक्ष संबंध नाशिकशी येत असल्याची चर्चा आहे

Loading

ShareTweet
Previous Post

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

Next Post

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White