• Latest
  • Trending
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
धक्कादायक ! नाशिकमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार

धक्कादायक ! नाशिकमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार

October 18, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
News Black & White
Monday, October 19, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

YOU MAY ALSO LIKE

धक्कादायक ! नाशिकमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

नाशिकची जागा शिंदे गटाच्या शिवसेनेकडे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी घोषित

नाशिक : नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुतीमधील नाशिकची जागा शिंदे गटाच्या शिवसेनेकडे गेली आहे. मात्र उमेदवारांची घोषणा होण्याआधीच भाजप नेते आणि नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे, गणेश गीते यांनी भाजप पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गीते यांनी थेट पक्षश्रेष्ठींचा हवाला दिला होता. ते म्हणाले होते की, “मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माझे नेते गिरीश महाजन यांनी या जागेसाठी शब्द दिला होता. पक्षाने दिलेल्या याच शब्दामुळे त्यामुळेच मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यामुळे गणेश गीते यांनी आपला अर्ज दाखल करून थेट महायुती पुढे आव्हान उभे केले. गणेश गीते यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जावर भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी सूचक अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.प्रदेश स्तरावरून थेट नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा करण्यात आली आहे. “नेमक्या कोणाच्या आदेशानुसार या सूचक आणि अनुमोदक स्वाक्षऱ्या करण्यात आल्या?” असा सवाल प्रदेश पातळीवरून विचारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गणेश गीते यांच्या उमेदवारी अर्जावर स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या स्वाक्षऱ्या हा भाजपचा अंतर्गत डावपेच किंवा राजकीय खेळी आहे, की स्थानिक नगरसेवकांचा केवळ अतिउत्साह, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यादरम्यान गीते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.

Loading

Previous Post

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

Next Post

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White