भाजपाला मतदारांची सर्वाधिक पसंती

नाशिक :लोकसभा निवडणुकीत चर्चा जरी इंडिया आघाडीची राहिली तरी एकट्या भाजपाने देशात सर्वाधिक जागा जिकल्या आहेत. भाजपासह एनडीएने एकूण 292 जागा जिंकत आघाडी घेतली आहे. तर कॉग्रेससह इंडिया आघाडीने 234 जागा जिंकत एनडीए समोर स्पीडब्रेकरचे काम केले आहे दोन्ही गटातील घटकपक्षांची आकडेवारी बघितली तर एकट्या भाजपाने जिंकलेल्या 240 जागा व एकूण इंडिया आघाडीच्या 234 जागांच्या तुलनेत जास्त आहेत. भाजपाला मोठे यश मिळाले ते पश्चिमेकडील गुजरात पासून ते राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड,ओडिशा या राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली, दिल्ली, हिमाचल प्रदेश उत्तराखंड मध्ये दमदार कामगिरी केली तर तेलंगणा, केरळ, आंध्र प्रदेश मध्ये मिळालेल्या जागा या बोनस ठरल्या. तर इकडे कॉग्रेसने देशात 99 जागा पटकावल्या यात महाराष्ट्राची साथ मोठी ठरली .महाराष्ट्रात कॉग्रेस एक वरून थेट तेरा वर पोहचली, केरळ तेलंगना, कर्नाटक या राज्यानी कॉग्रेसला साथ दिली. भाजपा -240, तेलगू देशम-16, जदयु -12 शिंदेंसेना-7 लोजपा-5 जनसेवा-2 इतर -10 (म्हणजेच एनडीए -292) कॉग्रेस -99 ,समाजवादी पार्टी -37 तृणमूल काँग्रेस-29, द्रमुक-22, ठाकरेसेना -9 ,शरद पवार गट -8 ,इतर -30 *(म्हणजेच इंडिया आघाडी -234)

![]()











