झाडे किती लावली आणि किती वाचली ते सांगा !

नागपूर : अमरावती भंडारा काटोल व उमरखेड रोडवर आत्तापर्यंत किती झाडे लावण्यात आली व त्यापैकी किती झाडे वाचली याची माहिती येत्या 18 मार्चपर्यंत सादर करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिला यासंदर्भात अँड अरुण पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली यावेळी न्यायालयाने ओसीडब्ल्यू महानगरपालिका व महावितरण कंपनी यांच्यामुळेही महामार्ग खराब होतात असे मत देखील व्यक्त केले तसेच या यंत्रणांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता न्यायालयात हजर होते त्यांनी दुरुस्ती कामे करणे अतिक्रमण हटविणे वाहतूक सुरळीत करणे आधी संदर्भात आवश्यक पावले उचलण्यासाठी शहरातील रोडचे निरीक्षण करणार आहे अशी माहिती न्यायालयाला दिली आहे
![]()














