
नाशिक : महापालिकेचे प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्यासह विविध कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार व पर्यावरण उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या बदलीनंतर साताळकर यांचा पदभार मुख्य लेखा वित्त अधिकारी दत्तात्रेय पाथरूट यांच्याकडे तर कर विभागाचा उद्यानचे अधीक्षक विवेक भदाणे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे याशिवाय मुंडे व समाज कल्याण उपायुक्त प्रशांत पाटील यांचा पदभार अद्याप कोणाकडेही देण्यात आलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वजिल्ह्यात नियुक्ती असलेल्या 34 उपायुक्त व उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश नगरविकास विभागाने जारी केले आहेत. आयुक्त व उपायुक्त दर्जाचे अधिकारी कार्यरत असतील तर त्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्य सचिवांना दिले होते
![]()














