• Latest
  • Trending
तपोवनाचा वाद, संतापले हरित लवाद

तपोवनाचा वाद, संतापले हरित लवाद

December 13, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

तपोवनाचा वाद, संतापले हरित लवाद

YOU MAY ALSO LIKE

मनपा कडून नोटिसा आणि साधू-महंतांचा संताप

तपोवन रविवारी नागरिकांच्या गर्दीने दुमदुमले

महापालिकेच्या मनमानी कारभाराला राष्ट्रीय हरित लवादाने लावला चाप

नाशिक : नाशिकच्या तपोवनात साधुग्राम उभारणीसाठी १८२५ झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या मनमानी कारभाराला राष्ट्रीय हरित लवादाने तात्पुरती स्थगिती देऊन तपासासाठी संयुक्त समिती नेमली आहे.होऊ घातलेल्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातील झाडे तोडण्याच्या तयारीत असणाऱ्या नाशिक महानगरपालिकेला राष्ट्रीय हरित लवादाने चाप लावला आहे. कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तपोवन परिसरातील झाडे तोडण्यास तात्पुरती मनाई केली. या संदर्भात तातडीने संयुक्त समिती स्थापन करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कायदेतज्ज्ञ श्रीराम पिंगळे यांनी हरित लावादमध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हरित लवादाने तात्काळ निकाल देत तपोवनातील वृक्षतोड थांबवण्याचे आदेश दिले आहे. नाशिक महानगरपालिकेला आदेश देत या परिसरातील एकही वृक्ष तोडू नये ,त्याच बरोबर वृक्षतोडी बाबतचा अहवाल, तसेच त्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या MICE हबचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेत काय म्हटले आहे?
याचिकाकर्ते श्रीराम पिंगळे यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हंटले आहे आहे की जून २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या वृक्षतोडीच्या बदल्यात मनपा प्रशासनाने १७ हजार झाडे लावण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात ती रोपे लावली नसल्याची परिस्थिती याचिकेत मांडली आहे. ग्रीन बिल्ड’च्या नावाखाली नदीपात्रात बांधकाम….
साधुग्रामासाठी प्रस्तावित MICE हबच्या निमित्ताने, ग्रीन बिल्डिंग संकल्पनेच्या नावाखाली नदीपात्रात ‘रीक्रीएशन सेंटर’ उभारले जात असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. “कुंभमेळ्याच्या नावाने हे बांधकाम का?” असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, प्रकरणावरील पुढील सुनावणी १५ जानेवारी रोजी असून नाशिक महापालिकेच्या संबंधित पाच अधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सोबतच न्यायालयाने स्वतंत्र समिती गठित करून वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या दोन्ही समित्यांची अहवाल १५ जानेवारीला सादर करावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Loading

Previous Post

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना उमेदवारी देणार का ?

Next Post

आमदाराची बदनामी, यूट्यूब पत्रकारांना कारावास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White