झाडे तोडू नका, नाशिककर ठाम

नाशिक : महापालिकेने 1834 झाडे तोडण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्या पार्श्वभूमीवर नागरिकांसह पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत. प्रशासनाच्या निर्णयाविरोधात रविवारी तपोवन परिसरात मोठी गर्दी झाली होती. यामध्ये सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांनी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनात सहभाग नोंदवला यामध्ये सकाळच्या निसर्गरम्य वातावरणात योगाच्या वर्गापासून सुरवात झाली. त्यानंतर नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या माध्यमातून कलाकारांनी विविध निसर्ग गीते, भावगीते म्हणत वृक्षतोडीला विरोध केला. अनेक नागरिकांनी तर चहा, केळी वाटप केली तर अनेक कुटुंबानी आपल्या लहान मुलांबरोबर याठिकाणी घरून आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला तपोवन सकाळ पासून तर रात्रीपर्यंत नागरिकांच्या गर्दीने दुमदुमून गेले होते. अनेक नागरिकांनी संताप व्यक्त करत वृक्षतोडीला विरोध केला तर अनेक चित्रकारांनी या ठिकाणी हजेरी लावत निसर्गरम्य चित्र काढत विरोध नोंदविला तर अनेक अभ्यासकांनी वृक्षतोड केल्यास पशु पक्षांवर तसेच मानवी जीवनावर काय परिणाम होईल याचा संदेश देत फलक झळकावत घोषणा दिल्या तर एक वृद्ध महिला वृक्षतोडीच्या विरोधात सह्याची मोहीम राबताना दिसली.. त्याचबरोबर दिवसभरात प्रख्यात साहित्यिक राजन खान, उत्तम कोळगावकर यांनी भेटी देत वृक्षतोडीला विरोध केला तर हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने वृक्षांना राखी बांधत प्रेम व्यक्त करण्यात आले यावेळी पक्षप्रमुख रामसिंग बावरी उपस्थित होते. ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन व इफ्टा,आरसीसी चेस अकादमी, स्पंदन संघटना, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन यांनी अनोखे आंदोलन केले तर इंदिरानगर परिसरातून ताहीर भाई शेख,जयेश भाई, प्रवीण नागरे,अमोल लाले यांनी वृक्षतोडी विरोधात फलक झळकावत वृक्षतोडीला विरोध केला


![]()















