मंत्रिपद काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली राज्यपालांकडे शिफारस

नाशिक :राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत असून नाशिक सत्र न्यायालयानं मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं, त्यानंतर कोकाटे यांनी मोठा निर्णय घेतला असून, त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नाशिकमधील सदनिका गैरव्यवहार प्रकरण माणिकराव कोकाटे यांना चांगलंच भोवलं आहे, हे प्रकरण 1995 सालचं आहे, या प्रकरणात कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यानंतर आता नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वारंट जारी केलं आहे या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी यासाठी माणिकराव कोकाटे यांनी आज उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती, मात्र न्यायालयानं या प्रकरणावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला. हाय कोर्टाकडून देखील कोकाटे यांना दिलासा मिळाला नाही. सध्या कोकाटे हे लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान त्यांनी दिवसभरात घडलेल्या घडामोडींनंतर अखेर आता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.माणिकराव कोकाटे यांची खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यापल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा संदर्भ देत राजीनामा मंजूरही केला केला असल्याचे समजते आहे.

![]()















