छगन भुजबळ आजारी तर कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार

नाशिक : नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सात आमदार आहेत.जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. त्यातील तीन कॅबिनेट मंत्रीपदे एकट्या राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार गट) यांच्याकडे असल्याने जिल्ह्यात आता राष्ट्रवादीचा चांगलाच दबदबा वाढला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ (अन्न व औषध) या तिघांकडे मंत्रीपदे आहेत. शिवाय वजनदार खाती आहेत. यामध्ये माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने अजित पवार गटाला “घर” घर लागल्याचे चित्र दिसत आहे. शहरात महापालिका निवडणुकीनंतर कुंभमेळा आहे. या कुंभमेळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील भाजप, शिंदे गट, अजित पवार गट यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे मात्र कुंभमेळाचा रस्ता हा महानगरपालिकेतून जातो त्यामुळे मनपा ताब्यात घेण्यासाठी तिघेही पक्ष सरसावले असतानाच अजित पवारांची राष्ट्रवादीला एकामागून एक धक्के बसत आहेत. राज्यात 15 जानेवारीला निवडणुका आहेत. राज्यातील मनपा निवडणुकीत मुंबई नंतर नाशिककडे सर्वच पक्षांच्या नजरा आहेत त्याला कारण कुंभमेळा आहे. त्यातल्या त्यात नाशिकच्या पदभार असणाऱ्या मंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकवर लक्ष केंद्रित करत बैठकांचा सपाटा लावला आहे. जर भाजप बरोबर युती झाली नाही तर ते वेगळा डाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे गिरीश महाजन यांनी कुंभमंत्री म्हणून कुंभमेळ्यावर नियंत्रण मिळविले आहे मात्र या अटीतटीच्या लढाईत अजित पवारांची राष्ट्रवादी मागे पडत असल्याचे चित्र आहे क्रीडामंत्री अँड माणिकराव कोकाटे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या चुकीमुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा दयावा लागला असून अटकेची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर लटकत असताना इकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आजारी असल्याने ते रुग्णालयात आहेत तर नरहरी झिरवळ यांचा नाशिक शहराबरोबर कनेक्शन नाही. त्यामुळेच या मोठ्या लढाईत अजित पवारांची राष्ट्रवादी लढण्याआधीच शांत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

![]()















