विदर्भ,मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांना सवलत

मुंबई : विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांना वार्षिक 1200 कोटी रुपयांची वीज सवलत 2027 पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला त्यामुळे या भागातील उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे. औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या या तीन भागांमधील डी व डी प्लस क्षेत्रातील उद्योगांना ही सवलत आधीपासून देण्यात येत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 1 एप्रिल 2016 पासून ही सवलत लागू करण्यात आली होती तिची मुदत 31 मार्च 2019 पर्यंत होती त्यानंतर ती 31 मार्च 2024 पर्यंत वाढविण्यात आली होती आता ती 2026 -27 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे तीन वर्षात 3600 कोटी रुपयांची वीज सवलत या भागांमधील उद्योगांना मिळणार आहे ही सवलत दिल्याने महावितरण वर जो आर्थिक बोजा पडणार आहे त्याची भरपाई राज्य सरकार करेल. 2016 मध्ये सर्वप्रथम ही सवलत देताना जे स्वरूप होते तेच कायम राहील
![]()














