रविवारी रात्री अशोका मार्गा जवळील श्री श्री रविशंकर मार्गावरील महादेव पार्क इमारतीच्या पार्किंगमध्ये गोळीबार व खुनाची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली होती. याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले की एकलहरा रोड परिसरात राहणारा अमोल काटे (40) याने लष्करात नऊ वर्ष नोकरी केली असून सध्या तो सुरक्षारक्षक म्हणून काम करतो पत्नीच्या मोबाईलमधील फोटोमुळे अमोलला रविशंकर मार्गावरील महादेव सोसायटीत राहणाऱ्या कुंदन घडे (48) याच्याशी पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचे समजले होते त्यामुळे अमोल पत्नीपासून वेगळा राहत होता. रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अमोल आपल्या दुचाकीवरून महादेव पार्क सोसायटीत आला यावेळी अमोल व कुंदन यांच्यात जोरदार भांडण झाले यावेळी कुंदनचा लहान भाऊ चेतन देखील त्याठिकाणी होता यादरम्यान अमोल याने आपल्या बरोबर आणलेल्या गावठी कट्यातून कुंदनच्या दिशेने गोळीबार केला ती गोळी हुकल्यावर अमोल याने सोबत आणलेल्या चाकूने कुंदन याच्या पोटावर वार केले यादरम्यान कुंदन व चेतने अमोलचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. अमोलला मारहाण करत त्याच्या डोक्यात हेल्मेट ने जोरदार प्रहार केल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. सोसायटीच्या पार्किंगमध्ये गोळीबाराचा आवाज झाल्याने रहिवाशी देखील खाली आले. घटनेची माहिती मिळताच उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली या मारहाणीत अमोल याचा मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळा वरून गावठी कट्टा, चाकू जप्त केला आहे तर चेतन यास ताब्यात घेतले
![]()














