नाशिक लोकसभा मतदारसंघात नव्या समिकरणांची नांदी होण्याची शक्यता असून तश्या घडामोडी वेग धरत आहेत, नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणारे शांतिगिरी महाराज यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निमंत्रण आल्याने व दोघांमध्ये भेट झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटावर भाजपा नेत्यांचा दबाव वाढत असून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शांतिगिरी महाराजांसाठी भाजपा नेते आग्रही असल्याचे समजते त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शांतिगिरी महाराज यांच्यात बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली असेल याबाबत राजकिय वातावरण तापले आहे त्यात अजून बैठक होणार असल्याचे वृत्त असून शांतिगिरी महाराज लोकसभेचे उमेदवार असल्यास नव्या समिकरणांची नांदी ठरणार आहे मात्र शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचे काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
![]()














