मुंबई–मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्याना दमदाटी केली म्हणून शरद पवार यांनी एकदा दमदाटी केली हे ठिक आहे पुन्हा दमदाटी केलीस तर याद राख ! शरद पवार म्हणतात मला ! असा इशाराच त्यांनी शेळके यांना दिल्याने राजकिय वातावरण तापले असून यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शरद पवार यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याने अशी धमकी देणे योग्य नाही, शरद पवार हे मोठे नेते आहेत त्यांच्यासारख्या नेत्याने साध्या आमदाराला धमकी देणं अयोग्यच वाटतं यामुळे त्यांचा स्तर खाली येईल असेही फडणवीस म्हणाले
![]()














