नाशिक -लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये 18 व वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी (गुरुवारी) सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर सायंकाळी त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले त्यानंतर आज सकाळी श्री काळाराम मंदिरात राज यांनी पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह भेट देत आरती केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी त्यांनी नाशिक शहरात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली त्यानंतर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लोकसभेची रणनीती ठरवण्याची शक्यता आहे. शनिवारी मनसेच्या वर्धापणदिनानिमित्त कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात त्यांची सभा होणार आहे या सभेला राज्यभरातून प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी ब्लॅक अँड वाइट न्यूजला दिली, सभा यशस्वी करण्यासाठी माजी महापौर अशोक मुतडक, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार प्रयत्नशील आहेत.
![]()














