• Latest
  • Trending

टाटांचा शेअर उच्चांकी किंमतीवर

March 8, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

टाटांचा शेअर उच्चांकी किंमतीवर

YOU MAY ALSO LIKE

नाशिकच्या पुराचा मापदंड, दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला

1 एप्रिलपासून बदलणार बँकांचे नियम

गुंतवणूकदारांना रिटर्न दिला दमदार

टाटा समूहाच्या शेअरवर मार्केटमधील गुंतवणूकदार नेहमीच बारीक लक्ष ठेवून असतात. शेअर बाजारात सूचिबद्ध टाटा ग्रुपच्या शेअर्सनी आतापर्यंत भरघोस परतावा दिला आहे. या दरम्यान, मागील वर्षभर रेंगाळणारा टाटा समूहाचा शेअर आता आपली ‘पॉवर’ दाखवत आहे. टाटा मोटर्सचा शेअर एकीकडे काही काळापासून उत्कृष्ट परतावा देत आहेत, त्याचवेळी हा पॉवरफुल टाटा शेअर आज इंट्राडे नव्या उच्च पातळीवर पोहोचले आहेत.

टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवर संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. कंपनीला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून (MERC) वीज दर वाढवण्याची परवानगी मिळाली असून या बातमीचा कंपनीच्या शेअर्सवर जोरदार परिणाम झाला. टाटा पॉवरचा शेअर गुरूवारी ७.६४% मजबूत वाढीसह नव्या उच्चांकावर बंद झाला. गेल्या वर्षभरात टाटा ग्रुपच्या या पॉवर शेअरने १००% परतावा दिला आहे.

MERC कडून शुल्क वाढवण्यास मान्यता
मिळालेल्या माहितीनुसार टाटा पॉवरला MERC कडून दर वाढवण्याची परवानगी मिळाली असून कंपनीला आर्थिक वर्ष २०२५ साठी सरासरी दर २४% वाढवण्यास मान्यता मिळाली असून कंपनीचे नवीन दर १ एप्रिल २०२४ पासून लागू होतील.

टाटा पॉवर नवीन उच्चांकावर
टाटा पॉवरच्या दरात वाढ करण्याच्या मंजुरीचा सकारात्मक परिणाम शेअर्सच्या हालचालीवर दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी, शेअर ७.६४% वाढीसह ४२४ रुपयांवर बंद झाला. इंट्राडे दरम्यान शेअरने ४३३.२० रुपयांचा उच्चांक गाठला जो शेअरचा ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. तर टाटा पॉवर शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक ३९६ असून बीएसईवर कंपनीचे बाजार भांडवल १.३६ लाख कोटी रुपये होते.

टाटा पॉवर शेअर्सच्या कामगिरीवर नजर टाकल्यास गेल्या एका वर्षात या शेअरने १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला तर सहा महिन्यांत या शेअरने गुंतवणूकदारांना ६०% परतावा दिला आणि तीन महिन्यांत ३०% हून अधिक परतावा दिला आहे.

Loading

Previous Post

आता प्राण्यांसाठीही मोफत रुग्णवाहिका

Next Post

राज ठाकरे ठरवणार लोकसभेची “रणनीती”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White