• Latest
  • Trending
‘…मुख्यमंत्री मीच होणार ?

‘…मुख्यमंत्री मीच होणार ?

October 6, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

‘…मुख्यमंत्री मीच होणार ?

YOU MAY ALSO LIKE

राष्ट्रवादीला आता भुजबळ झाले “परके”

नाशकात कामांचा धडाका आणि घोषणांचा पाऊस !

महाआघाडीत रंगला कलगीतुरा

नाशिक : राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. 2019 भाजपा बरोबर निवडणूक लढवणारी शिवसेना कॉग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान होतील याची कोणी कल्पना देखील केली नव्हती. राजकारणात एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक नेत्याला मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडत असतात. उपमुख्यमंत्री दोन असू शकतात मात्र मुख्यमंत्री हा एकच असतो. अनेक मोठ्या नेत्यांना क्षमता असूनदेखील मुख्यमंत्री पद मिळू शकले नाही . मात्र नशीबवान ठरले ते नारायण राणे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि आता एकनाथ शिंदे, …लोकसभा निवडणूक संपली आता विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांची संख्या आता वाढणार आहे . आमचाच मुख्यमंत्री होणार असे महायुती व महाआघाडीतील नेते दावे करत आहेत महाआघाडीत तर सध्या मुख्यमंत्री पदावरून मोठा कलगीतुरा रंगला आहे. लोकसभेत महाराष्ट्रात सर्वात जास्त खासदार आमचे निवडून आले आहेत त्यामुळे विधानसभेच्या जास्त जागा देखील आम्हाला मिळतील असे कॉग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सांगत आहेत. तर नाना पटोले म्हणतात आमच्या जास्त जागा तर मुख्यमंत्री देखील आमचाच असणार. मात्र या दाव्यामुळे ठाकरेंची शिवसेना भडकली असून खा. संजय राऊत म्हणतात लोकसभेत कॉग्रेसच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. इतकेच काय तर राऊत म्हणतात लहान भाऊ मोठा भाऊ,मधला भाऊ, असे कोणी म्हणत असेल महाराष्ट्रातील भविष्यातील चित्र वेगळे असू शकते असा दमच त्यांनी कॉग्रेसला भरला आहे. तर सुरवातीला आम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये नाही म्हणणारे शरद पवार म्हणतात की निवडणूक संपल्यावर व कोणाच्या जागा जास्त याचा विचार करून मुख्यमंत्री बनवू ,पवारांच्या या विधानामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची तोंड दाबून बुक्यांचा मार अशी अवस्था झाली आहे. तर इकडे महायुतीत सर्वानाच मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. मध्येच भाजपा नेते म्हणतात देवा भाऊ मुख्यमंत्री होणार तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री नाराजी व्यक्त करून भावी मुख्यमंत्री शिंदेच असणार असे सूनवतात तर मधेच अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकतात सध्या लाडकी बहीण वरून देखील जोरदार खेचा-खेची सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी देखील नशीब लागते आजच्या अस्थिर राजकारणात मुख्यमंत्री पदी कोण बसणार हे सांगता येणे अवघड असून होऊ शकते भविष्यात स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे, अन्यथा ठाकरे परिवारातील कोणीही असू शकते. कारण स्वप्न कोणीही पाहू शकतात आणि ते पाहण्याचा अधिकार सर्वांचा आहे. इतके मात्र खरे की शरद पवार यांनी आपले संपूर्ण लक्ष पश्चिम महाराष्ट्रावर केंद्रित केले असून याठिकाणी अनेक नेते तुतारी वाजवण्यास तयार आहेत. तर कॉग्रेसचे लक्ष मराठवाडा विदर्भ याकडे असून ठाकरेंचं लक्ष मुंबई, कोकण, नाशिक जिल्हा याकडे असणार असून हेच मार्ग मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचू शकतात हे नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. मात्र महायुती असो की महाआघाडी यांना एकीनेच लढावे लागणार तरच यश सोप्पे असणार आहे.

Loading

Previous Post

भाजपाचे “अण्णा” मनसेच्या संपर्कात ?

Next Post

आज मुंबईच्या”त्या” बंगल्यावर ठरणार कोणाचा पत्ता होणार कट ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White