भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत

नाशिक : लोकसभा निवडणुकीत महायुतीला झटका बसत महाआघाडीच्या जागा वाढल्या त्यानंतर महायुती एक-एक पाऊल विचारपूर्वक टाकत असतानाच नाशिक शहरात महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे. एकीकडे महाराष्ट्रात विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात महाआघाडी मधील राष्ट्रवादी पक्षाची तुतारी हाती घेण्यासाठी गर्दी वाढली असून याचा सर्वांत मोठा फटका भाजपा व अजित पवार गटाला बसताना दिसत आहेत . तर दुसरीकडे नाशिक शहरात भाजपाचे तीन आमदार असून त्यांची धाकधूक कायम आहे याला कारण म्हणजे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे झालेले गुप्त मतदान वरिष्ठांनपर्यंत पोहचले असून यामध्ये कोणाचा पत्ता कट होणार हे येत्या दिवसात कळेलच मात्र दुसरीकडे “अण्णा” हे खासदारकीसाठी पक्षाकडे अडून बसले होते यासाठी ते पक्षाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील जाऊन आले होते. यादरम्यान अण्णा यांनी हेमंत गोडसे यांना मोठ्याप्रमाणात विरोध केला होता. आता मात्र “अण्णा” करो या मरो च्या भूमिकेत असून ते भाजपा ला धक्का देत मनसेच्या इंजिन मध्ये बसण्याची शक्यता असून पश्चिम विधानसभा मतदारसंघातुन ते भाजपाला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांबरोबर त्यांची बोलणी देखील सुरू असल्याचे कळते यामुळे पश्चिम मतदार संघात मनसे च्या गळाला हा मोठा नेता लागल्यास पक्षाचा फायदाच होणार आहे. मात्र अजूनही महायुती व महाआघाडी यांचे तिकीट वाटप बाकी असल्यामुळे “अण्णा” नेमका काय निर्णय घेतात याकडे राजकिय अभ्यासकांचे लक्ष लागून आहे

![]()















