इंदिरानगरचा वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात

नाशिक : इंदिरानगर परिसरातील अनेक भागात होणाऱ्या खंडित विजपुरवठ्यामुळे नागरिक अनेक वर्षांपासून वैतागले होते .सारखी वीज जात असल्यामुळे फ्रीज वॉशिंग मशीन सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होऊन नागरिकांना आर्थिक नुकसान देखील होत असल्याने नागरिकांमध्ये वीज वितरण विषयी संतापाची भावना निर्माण होत होती . यामुळे भारतनगर परिसरातील वीज वितरण कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांमध्ये हाणामारीच्या देखील घटना घडल्या होत्या. त्यानंतर “न्यूज ब्लॅक अँड व्हाईट” ने हा मुद्दा उचलून धरत या परिसरात सत्ताधारी पक्षाचा आमदार,चार नगरसेवक असताना देखील नागरिकांना विजेसारख्या प्रश्नाला सामोरे जावे लागत असल्याचा “न्यूज ब्लॅक अँड व्हाईटच्या” बातमीची नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर लागलीच स्थानिक नगरसेवक व आमदारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला तर ठाकरे गटाच्या शिवसेनेने देखील मिटींग आयोजित करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती विचारली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी इंदिरानगरचा वीज प्रश्न थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारी पोहचला. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महावितरण कंपनीचे अध्यक्ष व मॅनेजिंग डायरेक्टर लोकेश चंद्र हे देखील उपस्थित होते. यावेळी महावितरणचे लोकेश चंद्र यांनी जागा हस्तांतरित करण्याची मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दूरध्वनीवरून नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ अशोक करंजकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना जागा हस्तांतरित करून देण्याचे आदेश दिलेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता डी. पी जाधव यांनी वडाळा येथील सदर जागेचा ताबा महावितरण कंपनीला दिला . वडाळा येथे नवीन 33/11 केव्ही उपकेंद्र आरडीएसए योजनेमध्ये प्रस्तावित असून त्या जागे संदर्भात महानगर पालिकेकडून नाममात्र दराने जागा हस्तांतरित करण्यासाठी नाहरकत देण्यात आलेली होती आता ही जागा हस्तांतरित करण्यात आल्याने इंदिरानगर वासीयांचा वीज प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


![]()














