विधिमंडळात आमदार सीमा हिरे यांचा प्रश्न

नाशिक : सातपूर आणि अंबड यांची ओळख नाशिक शहरातील औद्योगिक क्षेत्र म्हणून आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सातपूर, अंबड या औद्योगिक क्षेत्रात बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागा खरेदी करून त्यांचे तुकडे पाडून ते कमी दराने विक्री करणारे एक मोठे रॅकेट नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या प्रश्न आमदार सीमा हिरे यांनी विधिमंडळात उपस्थित केला आहे. नाशिकमधील औद्योगिक वसाहतीत 11 बंद पडलेल्या कंपन्या खरेदी करून त्यांचे 176 तुकडे करून भूखंड विकण्यात आल्याचा आरोप आमदार हिरे यांनी केला. औद्योगिक वसाहतीत काही कंपन्या बंद आहेत. त्यावर मोठे उद्योग यावेत अशी उद्योजक आणि नागरिकांची मागणी आहे. अशा बंद कंपन्यांच्याबाबत शासनाचे कोणतेही धोरण नसल्याने या कंपन्या काही लोक घेतात. शासनाचे दर 4 ते 5 हजार रुपये चौरस मीटर आहेत मात्र भूखंड घेणारे लोक 30 ते 35 हजार रुपयांनी भूखंड विकत असल्याचे सीमा हिरे म्हणाले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योगांबाबत शासनाचे धोरण आहे. असे सांगतानाच या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल असे आश्वासन दिले.

![]()














