• Latest
  • Trending

दारूच्या नशेत गाडी चालवत आहात, नागरिकांचा जीव इतका स्वस्त आहे का ?

July 11, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

दारूच्या नशेत गाडी चालवत आहात, नागरिकांचा जीव इतका स्वस्त आहे का ?

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाशिक शहरात “हिट अँड रनच्या” वाढत्या घटना धक्कादायक

नाशिक : मुंबई, पुणे पाठोपाठ आता नाशिक शहरात देखील रस्त्यांवर हिट अँड रन च्या घटना घडू लागल्याने नाशिककरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक शहर मोठ्याप्रमाणात वाढत असून अपघातांचे प्रमाण देखील वाढू लागले आहे .मागील वर्षी एक शिक्षक मद्य प्राशन करून संपूर्ण नाशिक शहरात आपली कार फिरवत अनेक नागरिकांना उडवले होते . त्यावेळी त्या शिक्षकाची कार थांबविण्यासाठी पोलिसांच्या अनेक गाड्या त्याचा पाठलाग करतानाचे चित्र संपूर्ण नाशिक शहराने बघितले होते. काल गंगापूर परिसरातील बारदान फाट्याजवळ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हनुमाननगर येथे राहणाऱ्या अर्चना किशोर शिंदे (31,रा हनुमाननगर) या परिसरातील एका हॉटेलमध्ये धुणीभांडीची कामे करून घरी जात असताना पाठीमागून सुसाट आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या मुख्य म्हणजे महिलेला धडक दिल्यानंतर सुद्धा करचालकाने कारचा वेग कमी केलेला नव्हता हे सीसीटीव्ही वरून स्पष्ट होते. मुख्य म्हणजे मयत अर्चना शिंदे यांच्या समोरून दोन युवक पायी येत होते. त्यांनी सुसाट येणारी कार बघितली व आरडाओरडा करत हात दाखवून कार चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र कारचालकाने त्याकडे दुर्लक्ष करत महिलेला जोरदार धडक दिली. आणि ती महिला उंच उडून रस्त्यावर पडली. यावरून कारचा स्पिड किती जास्त असेल हे लक्षात येते. यानंतर ते दोघे युवक रस्त्यालगत काही फूट अंतरावर फेकल्या गेलेल्या महिलेच्या दिशेने धावले. यावेळी परिसरातील लोकही धावून आले. त्यांनी जखमी झालेल्या महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तपासून डॉक्टरांनी मयत घोषित केले. पोलिसांनी तपास सुरू केला असता एका जागरूक नागरिकाने अपघातग्रस्त कारचा संपूर्ण क्रमांक घेतला होता यावरून पोलिसांनी वाहन पोर्टल द्वारे पत्ता शोधून कारचालक देवचंद रामभाऊ तिदमे (51,रा धृव नगर) यास राहत्या घरातून ताब्यात घेतले . त्याचप्रमाणे कार (एमएच 03 बीई 6634) कार ताब्यात घेतली. कारचालक तिदमे याने अपघाताच्यावेळी मध्य प्राशन केल्याचे वैद्यकीय चाचणी अंतिम अहवालात स्पष्ट झाले. कारचालक देवचंद तिदमे हा सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत नोकरी करतो कंपनीतून कारमधून घराकडे जात असताना मध्याच्या नशेत त्याला कारचा वेग लक्षात आला नाही. आणि कारवर ताबाही ठेवता आला नाही असे पोलिसांनी सांगितले अपघात स्थळी थांबून जखमीला मदत करण्याऐवजी तो सुसाट कार घेऊन घरी पोहचला होता. या घटनेत सीसीटीव्ही फुटेज महत्वाचे ठरणार असून हा महत्वाचा परिस्थितीजन्य पुरावा ठरू शकतो हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले असून मद्य प्राशन करत जाणीवपूर्वक वाहन चालवत अपघात करून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 105, 281 व मोटार वाहन कायद्याअंतर्गत 184/185नुसार त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशीच दुसरी घटना सिडको परिसरात घडली यामध्ये एका वाहनचालकाने(टेम्पो चालक) तब्बल सात ते आठ वाहनांना धडक दिल्याने या अपघातात सात ते आठ नागरिक जबर जखमी झाले मात्र मद्यप्राशन केलेला वाहनचालक जमावाच्या हाती लागताच त्याला जमावाकडून चोप देण्यात आला

हिट अँड रन सारख्या घटना यापूर्वी म्हणजेच काही दिवसांपूर्वी देखील घडल्या आहेत. सातपूर परिसरात मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत भरधाव जाणाऱ्या कारचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या रो-हाऊसची भिंत तोडून कार घरात घुसली या घरात झोपलेले तिघे जखमी झाले होते. तर थत्तेनगर परिसरात रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान भाजी घ्याण्यासाठी आलेल्या महिलेला भरधाव टेम्पोने उडवल्याने नीता वारे नामक महिला जागीच ठार झाली होती. “हिट अँड रनचा कायदा ” काय सांगतो सरकारी आकडेवारी नुसार दरवर्षी 50 हजार लोक हिट अँड रन मुळे मरण पावतात. गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितले होते की नवीन कायद्यात हिट अँड रनसाठी नवे कायदे आणण्यात येत आहेत या अंतर्गत रस्त्यावर एखाद्याची कार रस्त्यात एखाद्या व्यक्तीला धडकली आणि रस्त्यावर पडलेल्या मृत व्यक्तीला मदत करण्याऐवजी कारचालक पळून गेला तर त्याला 10 वर्षाचा तुरुंगवास आणि दंड भरावा लागेल. जर पीडित व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाल अथवा पोलिसांना माहिती दिल्यास या शिक्षेत दिलासा मिळू शकतो. सुरवातीच्या काळामध्ये यामध्ये दोन वर्षांची शिक्षा व लगेच जामीन मिळत होता.मात्र या नव्या कायद्याला देशभरात मोठ्याप्रमाणात विरोध झाला होता यावेळी ट्रक चालकांनी चक्काजाम आंदोलन देखील केले होते.

Loading

Previous Post

नाशिक पुन्हा हादरले, 80 वर्षाच्या वृद्धेचा विळ्याने गळा चिरून खून…

Next Post

नाशकात कंपन्यांच्या जागा विकणारे “रॅकेट”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White