• Latest
  • Trending

नाशकात किरकोळ कारणातून राग होतोय अनावर ! थेट खून

June 20, 2024
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात किरकोळ कारणातून राग होतोय अनावर ! थेट खून

YOU MAY ALSO LIKE

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

नेमकं कोकाटे प्रकरण काय ?

क्षुल्लक राग आणि जीवन बरबाद…

नाशिक : नाशिक शहराची ओळख संपूर्ण भारतात तीर्थक्षेत्र म्हणून असताना गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहरात हत्यांची मालिका सुरू झाली झाली आहे. अगदी किरकोळ कारणांवरून शहरात खून होऊ लागल्याने नाशिकची ओळख क्राईम सिटी म्हणून होऊ लागली आहे. या महिन्यात चक्क किरकोळ कारणातून तीन तरुणांचा खून करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पंचवटी परिसरातील मेरी- रासबिहारी लिंकरोडवर मोकळ्या जागेत रिक्षाचालक प्रशांत तोडकर याचा खून करून मृतदेह टाकून देण्यात आला होता. मुख्य म्हणजे तोडकर याचा खून त्याच्याबरोबर असलेल्या काही मित्रांनीच केला जुना वाद काढला आणि दगडाने ठेचून खून करण्यात आला. तर शुक्रवारी जुने नाशिक नाईकवाडी पुरा भागातील उत्कर्ष इमारतीसमोर काही युवक क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू वारंवार दुकानात येत होता त्यामुळे त्यांना समजवण्यास जितेंद्र गुलाबसिंग ठाकूर(रा, नाईकवाडी पुरा) गेले असता त्यांच्या डोक्यात संशयित सनी मोजाड याने बॅटने प्रहार केला. यामुळे ठाकूर हे जागीच कोसळून बेशुद्ध झाले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जितेंद्र ठाकुर हे एका खाजगी बँकेत नोकरीला होते. संशयित सनी याने बॅटने चार ते पाच वेळा प्रहार केल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिसरी घटना काल रात्री बारा वाजेच्या दरम्यान भारतनगर परिसरात घडली या खुनाला देखील कारण किरकोळ होत वडाळा रोड भागातील भारतनगर येथे राहणाऱ्या परवेज अय्युब शेख(31,रा. भारतनगर) याने स्वतःचा मोबाईल त्याचा मित्र अकिब इद्रिस सय्यद (30,रा भारतनगर) याच्याकडे गहाण ठेऊन 4,500 रुपये घेतले होते त्याने मोबाईल पुन्हा मागितला असता दोघांमध्ये वाद झाला यावेळी भारतनगर येथील मोकळ्या मैदानात अकिब याने परवेज याच्यावर धारधार शस्त्राने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी दंगल नियंत्रण तैनात केली होती रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हे सर्व खून अगदी किरकोळ कारणांवरून झाले असून खून करणारे मित्र किंवा ओळखीचे आहेत मात्र क्षणिक येणाऱ्या रागामुळे तरुण आपल्या संपूर्ण आयुष्याचे नुकसान करून घेत आहेत हे थांबले पाहिजे.

Loading

ShareTweet
Previous Post

गुजरातच्या रस्त्यांवर नाशिक पोलिसांचा थरार

Next Post

“मध्यरात्री”पासून केंद्र सरकारचा कठोर कायदा लागू…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White