• Latest
  • Trending

गुजरातच्या रस्त्यांवर नाशिक पोलिसांचा थरार

June 19, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

गुजरातच्या रस्त्यांवर नाशिक पोलिसांचा थरार

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

आयसीआयसीआय होम फायनान्स लूट

नाशिक :शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले गंगापूर परिसरातील आयसीआयसीआय होम फायनान्सच्या सेफ्टी लॉकरमधून सुमारे 5 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट झाल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली होती. यातील मुख्य संशयित वैभव लहामगे,तुकाराम गोवर्धने यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले होते मात्र या गुन्ह्यात निष्पन्न झालेले संशयित रतन, सतीश, आणि अर्जुन पाटील फरार होते, गुंडविरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांचे पथक त्यांच्या मागावर होते व त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. यादरम्यान दोघे संशयित आंध्र प्रदेशात देवदर्शनासाठी गेले असून त्यांनी तेथे ओळख लपवण्यासाठी टक्कल केले असल्याचे खात्रीशीर माहिती गुंडविरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी संशयितांचे लोकेशन शोधले असता ते गुजरात परिसरात फिरत असल्याचे समजले. पोलिसांनी वेळ वाया न घालता तडक गुजरात गाठले. पोलिसांनी तेथे जाऊन लॉज, हॉटेलची तपासणी केली मात्र दोघांचा ठावठिकाणा सापडत नसल्याने गेलेल्या पथकापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र तेथून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित सतीश चौधरी याने अहमदनगर येथून 3 लाख 41 हजार रुपयात सेकंड हॅन्ड कार खरेदी करून याच कारमधून त्यांनी तिरुपती बालाजी मंदिर गाठले तेथून गुजरातमध्ये आले .पोलिसांना इतकी माहिती पुरेशी होती पोलिसांनी गुजरातच्या हलोल शहरात संशयित व कारचा शोध सुरू केला. यादरम्यान त्यांना एका मारुती स्विफ्ट मोटारमधून दोन टक्कल केलेले व मराठमोळी टोपी घालून प्रवास करताना दिसले. पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला .पोलिसांनी त्यांना कार थांबवण्याचा इशारा दिला मात्र त्यांनी दुर्लक्ष करत कारचा वेग वाढविला आणि मग गुजरातच्या हलोल शहरात सुरू झाला सिनेस्टाईल पाठलाग गल्लीबोळात संशयित कार सुसाट पळवत होते .आणि पाठीमागे पोलिसांची कार धावत होती. पोलिसांची कार देखील खाजगी असल्याने नेमकं हा प्रकार काय घडत आहे हे स्थानिकांना लक्षात येत नव्हता त्यांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली .स्थानिक पोलीस देखील या दोन्ही कारच्या मागे लागले. तो पर्यंत या दोन्ही कार शहर सोडून हायवेवर आल्या होत्या पुढे एका जंगलाजवळ कार थांबून संशयितांनी जंगलात पळ काढला. पोलिसांनी देखील कार थांबवत जंगलात धावत सुटले, तब्बल तीन तासांनी पोलीस जंगलातून बाहेर पडले ते संशयित सतीश चौधरी याच्या हाती बेड्या ठोकूनच यावेळी बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती व स्थानिक पोलीस देखील होते. पोलिसांनी स्वतःची ओळखपत्रे दाखवताच जमलेल्या नागरिकांनी व पोलिसांनी टाळ्यांच्या गजरात नाशिक पोलिसांचे स्वागत केले पोलिसांनी संशयिताला घेत नाशिक गाठले ही कामगिरी गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण यांनी केली. या पथकाचे न्यूज ब्लॅक अँड व्हाईट च्या वतीने हार्दिक अभिनंदन…..

Loading

Previous Post

अजित पवार गट ठरतो आहे महायुतीला ओझे ?

Next Post

नाशकात किरकोळ कारणातून राग होतोय अनावर ! थेट खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White