• Latest
  • Trending
नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि  विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

September 28, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

शेअर बाजाराच्या बहाण्याने महिलेच्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेऊन अश्लील व्हिडिओची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर 

नाशिक : शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेअर बाजाराच्या बहाण्याने महिलेच्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेऊन अश्लील व्हिडिओची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर विवाहितेने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. जीवन संपवण्यापूर्वी विवाहितेने सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये तिने अश्लील व्हिडिओची धमकी देत ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. या प्रकरणी कैलास उर्फ बंटी मिस्तरी (रा. नाशिक) याच्याविरोधात एमआयडीसी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला शेअर मार्केटशी संबंधित व्यवसाय करत होती. कैलास मिस्तरी हा तिचा शालेय जीवनातील वर्गमित्र होता. काही महिन्यांपूर्वी दोघांची पुन्हा भेट झाली आणि त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यात संवाद सुरू झाला. महिलेच्या शेअर मार्केट व्यवसायात सहभागी होण्याच्या बहाण्याने मिस्तरीने तिचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्याकडून ओळखपत्रे घेतल्याचेही तपासात समोर आले आहे.तांत्रिक मदतीचे कारण सांगून संशयिताने महिलेच्या मोबाईलमध्ये एनीडेस्क हे रिमोट ॲक्सेस ॲप डाऊनलोड करून घेतल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे. या ॲपच्या माध्यमातून तिच्या नकळत मोबाईलचा ॲक्सेस मिळवल्याचा आरोप आहे. मोबाईलचा ॲक्सेस मिळाल्यानंतर व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधण्यात आला. व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडून त्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले आणि त्यानंतर या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.सततच्या ब्लॅकमेलिंगमुळे तसेच बदनामीच्या भीतीमुळे महिला मानसिक तणावाखाली होती, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 3 सप्टेंबर रोजी महिलेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला या घटनेची एमआयडीसी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान पोलिसांच्या हाती महिलेने लिहिलेली सुसाईड नोट लागली.संशयित कैलास ऊर्फ बंटी मिस्तरी विरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये शेअर बाजारात कामाचे आमिष दाखवत महिलेचा विश्वास संपादन केल्याची तक्रार समोर आली आहे. ‘पोलिसांत गेलीस तर मुलांना ठार मारीन’ अशी धमकी दिल्याचा बहिणीचा आरोप आहे. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत महिलेने आपला आक्रोश आणि भीती व्यक्त केल्याची पोलिसांची माहिती आहे. तिने आत्महत्येपूर्वी दोन ते तीन पानांची चिठ्ठी लिहून त्यामध्ये व्यथा मांडली होती. यामध्ये आई गं, मी कसे काय फसले ? मी खूप मोठ्या जाळ्यात अडकली आहे. मी सुद्धा चुकले. मला माफ करा.. असे पीडितेने सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. तर पिडीत महिलेला अश्लील व्हिडिओच्या आधारे त्याने पीडितेला वेळोवेळी ब्लॅकमेल करत तिच्या दोन्ही मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. धमकी देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप मृत महिलेच्या बहिणीने फिर्यादीत केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून गुन्हे शोध पथकाला तातडीने आरोपीचा छडा लावून बेड्या ठोकण्याचे आदेश दिले आहेत.

Loading

Previous Post

नाशिक महापालिकेकडून जुने कागदपत्र देण्यास टाळाटाळ ?

Next Post

17 वर्ष मतदान करूनही आता नागरिकत्वाचा पुरावा का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White