दोन-तीन दिवसांत होणार चित्र स्पष्ट

मुंबई :मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर दिल्लीत अलीकडेच भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते दोन वेळा भेटले फक्त लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा द्यायचा एवढाच मर्यादित विषय नव्हता तर राज ठाकरे यांना महायुती सोबत कायमस्वरूपी कसे आणता येईल या दृष्टीने व्यापक चर्चा सुरू असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचे विलीनीकरण करून शिवसेनेचे अध्यक्षपद तुम्ही घ्या(राज ठाकरे यांनी) नाहीतर लोकसभेला मनसेने महायुतीला पाठिंबा द्यावा आणि विधानसभेला सन्मानजनक जागा देऊ अन्यथा लोकसभेला एक दोन जागा देऊ आणि विधानसभेला मात्र कमी जागा देऊ असे तीन पर्याय भाजप आणि शिवसेनेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर ठेवण्यात आल्याचे समजते. यामुळे राजकीय वर्तुळात भूकंप येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मनसे यांचे विलीनीकरण हा विषय दोन्ही तिन्ही बैठकांमध्ये चर्चिला गेला त्याबाबत राज ठाकरे यांनी कोणताही शब्द दिला नाही ते या प्रस्तावासाठी अनुकूल नसल्याचे सूत्रांकडून समजते.

![]()














