• Latest
  • Trending

चर्चा कधी होणार आणि उमेदवार कधी ठरणार ? इच्छुकांचा जीव टांगणीला….

March 23, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

चर्चा कधी होणार आणि उमेदवार कधी ठरणार ? इच्छुकांचा जीव टांगणीला….

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

इच्छुक उमेदवारांच्या दिल्ली, मुंबई वाऱ्या सुरूच..

नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिकची जागा मिळवण्यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असून इकडे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या जीवाची घालमेल होत आहे नाशिकची जागा महायुतीतून शिंदे गट लढवेल अशीच चर्चा होती मुख्यतः या गटाचे खासदार हेमंत गोडसे विद्यमान असल्याने शिंदे गटच जागा लढवेल असे मानले जात असतानाचभाजपा कडून दिनकर पाटील यांचे नाव पुढे आले. आणि भाजपातील इच्छुक सरसावले आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सह्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले त्याच बरोबर भाजपा कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणाचा देखील इशारा दिला. हा तिढा सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील महायुती बरोबर युती झाल्यास नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावेदारी केली त्यांच्याकडून स्वामी शांतिगिरी महाराज, डॉ प्रदीप पवार ही नावे पुढे आल्याने पेच वाढला त्यानंतर ही जागा नक्की कोणाला सुटणार व उमेदवार कोण असणार यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतून नाशिकची जागा ठाकरे गट लढणार असे सांगण्यात येत होते विधान परिषदेच्या निवडणुकीत नाव निश्चित होऊन देखील संधी नमिळाल्याने विजय करंजकर यांना संधी देण्याचे आधी ठाकरे गटाकडून सांगण्यात येत होते. मात्र, नंतर पक्षांतर्गत गोंधळ असून पर्यायी उमेदवार शोधण्याचे काम पक्षीय पातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यात नितीन ठाकरे माणिकराव कोकाटे अशी अनेक त्यांची नावे चर्चेत येत असून पक्षाला सक्षम उमेदवार मिळत नसेल तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जागा सोडावी यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे समजते.शरद पवार गटाकडून गोकुळ पिगळे, नितीन ठाकरे यांच्या नावांची चर्चा आहे. त्याचबरोबर नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून चार तालुक्यांचा म्हणजेच ग्रामीण भागांचा समावेश आहे. जागा सुटत नसल्याने इच्छुक यांना प्रचार करावा की, जागा आणि उमेदवारीसाठी मुंबई, दिल्लीत वाऱ्या कराव्यात हा महत्त्वाचा प्रश्न पडला आहे त्यामुळे सर्वच पक्षांच्या इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे.

Loading

Previous Post

11 अतिरिक्त न्यायाधीशांची कायमस्वरूपी नियुक्ती…

Next Post

लोकांना गंडा घालणाऱ्या दानी-डेटा ऍपची 16 कोटी 43 लाखांची संपत्ती जप्त,ईडीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White