• Latest
  • Trending
न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही-पंतप्रधान मोदी

न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही-पंतप्रधान मोदी

May 12, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही-पंतप्रधान मोदी

YOU MAY ALSO LIKE

अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

ठरलं तर….या दिवशी पहिले ‘शाही स्नान’

भारताच्या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाककडून शस्त्रसंधीची याचना

वृत्तसंस्था : भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या जोरदार संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच (12 मे) आज देशाला संबोधित केले यावेळी केलं यावेळी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज मी (सशस्त्र दलांचे) हे शौर्य आणि धैर्य आपल्या देशाच्या प्रत्येक आईला, देशाच्या प्रत्येक बहिणीला आणि देशाच्या प्रत्येक मुलीला समर्पित करतो.ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींनी देशाच्या सैनिकांच्या शौर्याला यावेळी सलाम केला. 22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी क्रूरता दाखवली, त्यामुळे देश आणि जग हादरले. सुट्टी साजरी करणाऱ्या निष्पाप नागरिकांना धर्म विचारुन त्यांच्या मुलांसमोर निर्दयीपणे मारले, हे दहशतवादाचा अतिशय भयानक चेहरा होता, क्रूरता होती. हे दुःख माझ्यासाठी खूप मोठे होते.संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्षाने दहशतावादाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती यादरम्यान आम्ही दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्यासाठी भारतीय सैन्यांना पूर्ण मोकळीक दिली आणि आज प्रत्येक दहशतवादी, दहशतवाद्यांच्या प्रत्येक संघटनांना समजलंय की आमच्या बहिणी-मुलींच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचे परिणाम काय असू शकतात.ऑपरेशन सिंदूर हे केवळ नाव नाहीय. हे देशाच्या कोटी कोटी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. “ऑपरेशन सिंदूर” न्यायाचे शाश्वत वचन आहे. 6 मे रोजी उशीरा रात्री आणि 7 मे रोजी पहाटे संपूर्ण जगाने हे वचन परिणामांमध्ये बदलताना पाहिलंय. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकतो. जेव्हा देश एकजूट असतो, राष्ट्र प्रथम ही भावना असते, देश सर्वोच्च असतो तेव्हा कठोर निर्णय घेतले जातात. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. गेल्या अडीच ते तीन दशकांपासून ते पाकिस्तानात मोकाट फिरत होते. जे भारताविरुद्ध कट रचत होते, त्यांना भारताने एका झटक्यात संपवले.त्यानंतर देखील भारताबरोबरच उभे राहायचे सोडून पाकिस्तान दहशतवाद्यांबरोबर उभा राहत भारतावर हल्ले सुरू केले.त्यानंतर जगाने पाहिले की पाकिस्तानी ड्रोन, मिसाइल कसे उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणेने त्यांना आकाशातच उडवले. पाकिस्तानला वाटत होतं की सीमेवर हल्ला होईल, मात्र भारताने पाकिस्तानच्या छाताडावरच आघात केला.पाकिस्तानी हवाई दलाच्या एअरबेसला जबरदस्त नुकसान पोहोचवले. या एअरबेसचा पाकिस्तानला गर्व होता. पहिल्या तीन दिवसांतच पाकिस्तानला इतके उद्ध्वस्त केले, त्याचा अंदाजही पाकिस्तानला नव्हता. भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तान बदल्याचा रस्ता शोधायला लागला. विविध देशांकडे याचना करायला लागला. 10 मे च्या दुपारी मजबुरीने भारताच्या डीजीएमओंना फोन केला, मात्र तोपर्यंत दहशतवाद्याचे अड्डे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले होते, दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले होते. यामुळे पाकिस्तानकडून याचना केली गेली , दहशतवादी कारवाई यापुढे, सैनिकी कारवाई केली जाणार नाही तेव्हा भारताने त्यावर विचार केला आणि मी पुन्हा सांगतो की आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादी आणि सैनिकी ठिकाणांवर उत्तरादाखल केलेल्या कारवाईला स्थगित केले आहे. येत्या काही दिवसांत पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून असू. भारताचे सैन्य सतर्क आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर ऑपरेशन सिंदूर हे भारताचे दहशतवादाविरोधातील धोरण आहे. भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसे उत्तर दिले जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. जिथे दहशतवादाची मूळे आहेत तिथे जाऊन कठोर कारवाई करू. आण्विक अस्त्राच्या आधारे ब्लॅकमेल भारत सहन करून घेणार नाही. आण्विक अस्त्राच्या आडून दहशतवादी अड्ड्यांवर भारत निर्णायक कारवाई करेल.ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचा घाणेरडा चेहरा जगासमोर उघडा पडला. ठार मारलेल्या दहशतवादयांच्या अंत्यविधीला पाकिस्तानी सैन्याचे मोठे अधिकारी उपस्थित होते. सरकारपुरस्कृत दहशतवादाचा हा मोठा पुरावा आहे.ऑपरेशनमध्ये मेड इन इंडिया शस्त्रांची उपयुक्तता सिद्ध झाली. आज जग बघतंय की 21 व्या शतकातील युद्धात “मेड इन इंडिया” शस्त्रांची वेळ आली आहे. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाविरोधात आपल्या सर्वांचे एकत्र राहणे गरजेचे आहे. हे युग युद्धाचे नाही मात्र हे युग दहशतवादाचेही नाही. दहशतवादाविरोधात ‘झीरो टॉलरन्स’ हे उत्तम जगाची गॅरेंटी आहे. पाकिस्तानी सैन्य, सरकार ज्या रितीने दहशतवादाला पोसत आहे, ते पाहता दहशतवादच पाकिस्तानला संपून टाकेल. पाकिस्तानला वाचायचे असेल तर दहशतवादी ढाचा त्याला पाडावाच लागेल. टेरर आणि टॉक एकत्र होऊ शकत नाही. टेरर आणि ट्रेड एकत्र चालू शकत नाही. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. जगाला (अमेरिका व इतर देश) मी सांगतो की पाकिस्तानबरोबर बोलणे होईल तर ते दहशतवादासंदर्भातच होईल. पीओकेसंदर्भातच होईल. गरज पडल्यास शक्तीचा वापर गरजेचा आहे. गेल्या काही दिवसांत भारताने हेच केलं आहे. मी पुन्हा एकदा सैन्य दल, सशस्त्र दलांना सॅल्यूट करतो.

Loading

Previous Post

नाशकात पावसाचे ‘तांडव’

Next Post

पंतप्रधान मोदींची अचानक आदमपूर हवाई तळाला भेट 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White