कुंभातील अमृतस्नानाच्या तारखा जाहीर

नाशिक : मध्ये २०२६ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत साधू-महंतांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. नाशिकमध्ये ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणानंतर कुंभ पर्वाला सुरुवात होईल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक घेतली. यामध्ये 13 आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 31 ऑक्टोबर 2026 रोजीपासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. या दिवशी ध्वजारोहण शुभारंभ होईल. दुपारी 12 वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल. तर साधुग्राममध्ये 24 जुलै 2027 रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. तर 24 जुलै 2028 रोजीपर्यंत कुंभमेळा पूर्व सुरू राहणार आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या संभाव्य तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे.
29 जुलै 2027 रोजी नगर प्रदक्षिणा होईल. तर पहिले अमृतस्नान हे सोमवारी, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. तर या महाकुंभातील दुसरं अमृतस्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. तर तिसरं आणि शेवटचं अमृतस्नान हे 11 सप्टेंबर 2027 रोजी नाशिक येथे होईल. तर 24 जुलै 2028 रोजी सिंहस्थ मेळाचा ध्वज हा खाली उतरवण्यात येईल. या दिवशीपर्यंत कुंभमेळा सुरू राहील.
कुंभमेळा नियोजन संदर्भात होणाऱ्या बैठकीत कुंभमेळा मध्ये होणाऱ्या अमृत्स्नान तारखा जाहीर
त्रंबकेश्वर अमृतस्नान तारीखा जाहीर
ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात
पहिले अमृस्नान –2-08-2027 (आषाढ अमावस्या)
द्वितीय अमृस्नान – 31-08- 2027 ( श्रावण अमावस्या)
तृतीय अमृस्नान – 12- 09-2027 (वामन द्वादशी ) नाशिक कुंभ अमृतस्नान तारीख…….
31-10-2026 ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात
पहिले अमृस्नान –2-08-2027
द्वितीय अमृस्नान – 31-08- 2027
तृतीय अमृस्नान – 11- 09-2027



![]()















