पालकमंत्री नाही तर कुणाचे काही अडले का ?

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक -त्रंबकेश्वर सिहस्थ कुंभमेळ्याच्या तारखांवर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीआधी महंत राजेंद्र दास महाराज यांनी कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान न म्हणता, अमृत स्नान म्हणून संबोधले जावे अशी मागणी केली होती .त्यामुळे राज्य सरकारने देखील तातडीने तसा ठराव संमत केला. आता कुंभमेळ्यात होणाऱ्या स्नानाला अमृत स्नान असे संबोधण्यात येणार असल्याची चर्चा होती. यादरम्यान बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे गेले असता काही पत्रकारांनी शाही स्नानाच्या तारखा जाहीर झाल्यात मात्र नाशिकच्या पालकमंत्री पदाचे काय ? अशी विचारणा केली असता ही संधी साधत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आता शाही स्नान हे बंदच झाले असून पर्वणीच्या स्नानाला ‘अमृत स्नान’ असे संबोधायचे असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांच्या आणि त्याचा काही संबंध नाही. अमृत स्नान हे लाखो वर्षांपासून सुरू आहे. पालकमंत्री येतात, जातात, कुणाचे काही अडले का ? गिरीशभाऊ कुंभमंत्री आहेत ते करतील सर्व असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

![]()















