सातपूर,सिडको परिसरात झाडे उन्मळून पडली

नाशिक : सिडको, सातपूर परिसराबरोबरच वादळीवाऱ्यासह विजांचा कडकडाट अन ढगांचा गडगडाटात सुमारे तासभर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यादरम्यान ताशी 25 किमी वादळी वारे वाहत होते. यामुळे सिडको परिसरात अनेक ठिकानी एकापाठोपाठ एक झाड उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या यामुळे रिक्षा टेम्पो, कार यासारखे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांची तारांबळ उडाली तर सातपूर परिसरातील अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले. याठिकाणी देखील मोठी झाडे उन्मळून पडली तर शहरातील बाजारपेठेतील दहीपूल, सराफ बाजार तर इंदिरानगर परिसरात रस्त्यावर पाण्याचे लोंढे वाहत होते. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील बघावयास मिळाली जोरदार वाऱ्यांमुळे नेटवर्क कंपन्यांचे सर्व्हर डाऊन झाले होते त्यामुळे मोबाईल धारक त्रस्त झाले होते.तर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा, आंबा या पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 600 गावांमधील 14 हजार 613 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला.

![]()















