केंद्र सरकारने देशभरात नवीन भाडे करार 2025 चा नवा नियम

दिल्ली : केंद्र सरकारने देशभरात नवीन भाडे करार 2025 चे नवे नियम लागू केले असून या नियमांमुळे घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील होणारे वाद कमी होऊन भाड्याने राहण्याची प्रक्रिया अधिक सोप्पी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता प्रत्येक भाडे करार 2 महिन्यांच्या आत नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे. ही नोंदणी राज्य सरकारच्या ऑनलाइन प्रॉपर्टी रजिस्टेशन संकेतस्थळावर किंवा रजिस्टार कार्यालयात करता येईल मुदतीत नोंदणी न केल्यास 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. घरमालकांना कसा मिळणार दिलासा ? कर सवलत—-भाड्यावर टीडीएस कपातीची मर्यादा वाढवून 6 लाख रुपये आहे. त्यामुळे लोकांच्या हातात अधिक पैसे असणार. वाद निवारण—वाद लवकर सोडवण्यासाठी विशेष ट्रीब्युनल स्थापन करण्यात आली आहेत. हे वाद 60 दिवसात निकाली निघणार आहेत. भाडे थकल्यास—एकाद्या भाडेकरूने सलग 3 महिने वा त्याहून अधिक काळ भाडे भरले नाही, तर घरमालक ते प्रकरण ट्रीब्युनलकडे नेऊ शकतो. भाडेकरूंना कसा मिळणार दिलासा ? घर खाली करणे- योग्य नोटीस आणि कायदेशीर प्रक्रिया न पाळता कोणत्याही भाडेकरुला घरातून काढता येणार नाही. भाडेवाढ– भाडे वाढवण्यापूर्वी घरमालकाने भाडेकरुला आधीच नोटीस देणे बंधनकारक आहे. त्यामुळे मनमानी भाडेवाढ होणार नाही. सिक्युरिटी डिपॉझिट––राहत्या घरासाठी फक्त 2 महिन्यांचे भाडे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेता येईल. भाडे करार कसा नोंदवावा ? तुमच्या राज्याच्या मालमत्ता नोंदणी पोर्टलला भेट द्या. घरमालक आणि भाडेकरू दोघांची ओळखपत्रे अपलोड करा, यामध्ये भाड्याचे तपशील भरा. नंतर ई-साइन करून करार सबमिट करा यानंतर तुमच्या भाडेकराराची नोंद पूर्ण होईल.

![]()















