दोन दिवसात दुसरी घटना

नाशिक : शहरातील महात्मानगर परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्याने धुमाकूळ घालत अनेक नागरिकांना व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना जखमी केले होते यावेळी त्या बिबट्याला जेरबंद केल्यानंतर आज (सोमवार) पुन्हा एकदा त्याच परिसरात असलेल्या भोसला शाळेच्या आवारात बिबट्या दिसल्याने धावपळ उडाली असून त्यांनतर मात्र शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली .पालकांपर्यंत निरोप पोहचवितांना शाळेला मोठी कसरत करावी लागली. यादरम्यान जवळच्या परिसरात राहणारे पालक मिळेल त्या वाहनाने मुलांना घेण्यासाठी शाळेत पोहचले. काहींना शाळेच्या विद्यार्थी वाहतूक वाहनाच्या माध्यमातून घरापर्यंत सोडण्यात आले. दुसरीकडे वन विभाग ड्रोन आणि अन्य माध्यमातून बिबट्याच्या शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे नागरिक, विद्यार्थी, पालकांमध्ये घबराट पसरल्याचे चित्र आहे.

![]()














