ऑपरेशन ‘सिंदूर’ चा दणका…..

वृत्तसंस्था : पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.भारताने एअरस्ट्राईक करून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांचे अड्डे उद्धवस्त केले. विशेष म्हणजे भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचा “मोस्ट वॉन्डेट दहशतवादी” मसूद अजहरचा कुटुंबियांचाही खात्मा झाला आहे. जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी अजहरच्या कुटुंबातील 10 सदस्य मारले गेले आहेत. त्याचबरोबर या हल्ल्यात अजहरचे 4 खास सहकाऱ्यांनाही ठार मारण्यात आलं आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने मसूद अजहरच्या घरावर हल्ला केला आहे, ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. मसूद अजहरनेही यावर एक निवेदन जारी केले असून त्यात त्याने म्हटले की माझ्या कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारताने केलेल्या हल्ल्यात मसूद अजहरने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला गमावल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आपल्या माणसांना गमावल्यानतंर मसूद अजहरचं एक वक्तव्य समोर आले आहे. ‘मीही मेलो असतो तर बरं झालं असतं’, असं मसूद अजहरने म्हटले आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब, त्याच्या भावा आणि बहिणीसह, भारताकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात नष्ट झाल्याची माहिती समोर येते आहे. त्यानेच रचला होता संसदेवरच्या हल्ल्याचा कट…… मसूद अझहरने आजवर भारताविरुद्ध अनेक वेळा मोठे कट रचले आहेत. मौलाना मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये वाढलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. २००१ मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. यासह उरी हल्ल्यातही मसूद अझहर हाच सूत्रधार होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही त्यांनी भूमिका बजावली होती.

![]()















