क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

नवी दिल्ली :खेलो इंडिया स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येईल अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली .भारताला क्रीडा महाशक्ती म्हणून जगाच्या पटलावर आणण्याचे आमचे धोरण आहे त्यासाठी विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या वयोगटासाठी आणि दिव्यांगा खाली खेलो इंडिया गेम्स घेतले जातात 2018 साली या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आता ही स्पर्धा देशातील प्रमुख स्पर्धा बनली आहे यातील पदक विजेत्यांना सरकारी नोकरीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे याशिवाय या खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहेत
![]()














