भारत आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील आपले स्थान केले निश्चित

नाशिक :रचिन रवींद्रचे शतक आणि कर्णधार टॉम लॅथमच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडच्या विजयासह स्पर्धेतील अ गटातून यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांचा प्रवास संपला .चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आजच्या (२४ फेब्रुवारी) सामन्यात न्यूझीलंड आणि बांगलादेश आमनेसामने होते. रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली.यानंतर बांगलादेशने निर्धारीत ५० षटकात ९ बाद २३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ४६.१ षटकात २४० धावा करत सामना जिंकला. न्यूझीलंडच्या विजयासह स्पर्धेतील अ गटातून यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांचा प्रवास संपला आहे. या गटातून भारत आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.

![]()












