जिल्ह्यात तीन दिवस यलो अलर्ट

नाशिक : जिल्ह्याचे तापमान उष्ण झाले असून आता पुढील तीन दिवस नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरासह जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकटासह मध्यम तुरळक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी पावसासह मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. शनिवार ते मंगळवार या कालावधीत हवामान विभागाने पावसाचा “येलो अलर्ट” जारी केला आहे. दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. एकीकडे राज्यात उष्णता कायम असताना अवकाळीचे ही संकट घोंघावत आहे. शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी केली असताना अवकाळी आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

![]()















