पोलीस आयुक्तांबरोबरच, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांची भूमिका महत्त्वाची

नाशिक : कुंभमेळ्याच्या सुरू असलेल्या कामांवरून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त करत महायुती शासनाला एकप्रकारे घरचाच आहेर दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी पत्रकारांबरोबर संवाद साधताना भुजबळ म्हणाले, की महापालिकेने 16 हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कोण देईल ? सिहस्थासाठी नवीन बाह्यवळण रस्त्यांची घोषणा झाली मात्र सिहस्थाचा कालावधी लक्षात घेता भूसंपादन कधी होणार ? निधी कधी मिळणार ? कामे कधी होणार ? याबद्दल काहीच माहिती नाही. अंतर्गत व बाह्यवळण रस्ते तयार आहेत, जिथे खराब असेल तिथे दुरुस्त करता येणे शक्य आहे. यासाठी फारसे काही करण्याची गरज नसून गोदावरी नदीची स्वच्छता केली तरी सिहस्थ कुंभमेळा चांगला होईल. नाशिक -त्रंबकेश्वर शिर्डी रास्ता ही तयार आहे. गोदावरी नदीवर घाट तयार आहेत. साफसफाई व व्यवस्था उभारणीला प्राधान्य द्यायला हवे परंतु अनेकांचे लक्ष सिंहस्थ कामांच्या टेंडर कडेच असल्याचे सांगून भुजबळांनी टोला लगावला मात्र त्यांचा रोख नेमका कुणावर होता यावर आता राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पूर्वी चाकू हातात घेतला तर गावभर चर्चा आता…… मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील कोणत्याही विभागाची कामगिरी ठळकपणे नजरेत आली नसल्याच्या प्रश्नावर भुजबळांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. नाशिकला पालकमंत्री नसल्याने काही अडत नाही. कारण नियोजन अंबलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणाच असते. अधिकारी व्यवस्थित काम करणारे असायला हवेत त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. पूर्वी कोणी चाकू हातात घेतला तर गावभर चर्चा व्हायची आता त्याची सवय झाली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांची भूमिका यात महत्त्वाची असल्याचे भुजबळ यांनी सूचित केले.

![]()















