ऑरेंज अलर्टचा इशारा…..

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कालपासून शहरात सकाळपासून काही वेळ ऊन तर काही वेळ ढगाळ वातावरण होते. आज मात्र वाढते उन्ह आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते . आज संध्याकाळी 4.30 वाजेच्या सुमारास शहरातील काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र आहे. एकीकडे राज्यात पुढील दहा दिवस अवकाळी पावसाचे वातावरण असण्याची शक्यता आहे. त्यात नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी व घाट प्रक्षेत्रात दि. ०३ एप्रिल २०२५ रोजी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

![]()















