आता एका दिवसात केवळ तीन इमेजेस तयार करता येतील

वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर कार्टून सारख्या दिसणाऱ्या घिबली इमेजेसचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे. दिवसभरात कोट्यावधी नागरिक या इमेजेस तयार करून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याने ही छायाचित्रे तयार करून देणारे ओपन एआयचे आर्टिफिशीयल इंटेलिजन्स टुल चॅटजीपिटी रविवारी जगभरात बंद पडले होते. भारतात देखील सायंकाळी दीड तास बंद होते. त्यामुळे अखेर कंपनीने इमेजेस बनविण्यावर निर्बंध घातले आहे. मिळालेल्या माहितीनुसार युजर्समध्ये सध्या जीपीटी-4 ओची नवीन अपडेट स्टुडिओ गिबलीची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. यामध्ये जे युजर्स आहेत त्यांना आपले ॲनिमेटेड फोटो तयार करून मिळतात. असे फोटो तयार करून यूजर्सने फेसबुक आणि इंस्टाग्राम वर शेअर करणे सुरू केले. कोट्यावधी युजर्सनी यात एकाच वेळी सहभाग घेतल्याने चॅटजीपीटीवर अचानक ताण वाढला त्यामुळे पुढे आऊटटेज झाले. त्यामुळे आता फ्री व्हर्जन युजर्सना एका दिवसात केवळ 3 इमेजेस तयार करता येऊ शकतील. ते काय म्हणतात– फीचरची मागणी वाढल्याने ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमॅन यांनी एक्सवर पोस्ट केले. कृपया इमेज तयार करण्यामध्ये ब्रेक घ्या, टीमला झोपेची गरज आहे इमेज जनरेट मुळे सर्वर प्रचंड दबाव पडत आहे आमचे जिपीयु वितळत आहेत. इमेज जनरेटर वर तात्पुरती मर्यादा लावत आहोत. सर्व्हरची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.


![]()















