महापालिका क्षेत्रात 7.31 टक्के दरवाढ

नाशिक : घर खरेदी विक्री करणे आता महागणार आहे. सरकारने रेडीरेकनर दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे १ एप्रिलपासून घर खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.सुमारे तीन वर्षे दरवाढच केली नव्हती नाशिक महापालिका क्षेत्रात यंदा 7.31 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. शासनाने आर्थिक मंदी आणि कोराना या कारणांमुळे दरवाढ केली नव्हती 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता जे दर होते तेच 2023-24 आणि 2025 साठी कायम ठेवण्यात आले होते. मात्र वित्तमंत्री अजित पवार यांनी रेडिरेकनरच्या दरात दहा टक्के वाढ होईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार नवीन रेडिरेकनरचे दर घोषित करण्यात आले. त्यानुसार नाशिकमध्ये 7.31टक्के दर वाढवण्यात आली आहे. रेडिरेकनचे दर हे प्रत्येक महापालिकेनुसार वेगवेगळे असतात. ग्रामीण, शहरी भागात हे दर वेगळे असतात. त्यामुळे तुम्ही जिथे घर घेता त्यावर तुमच्या घर खरेदी विक्रीच्या व्यव्हरात किती वाढ होणार हे ठरणार आहे. सध्या ग्रामीण क्षेत्रात रेडिरेकनर दरात ३.३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात ४.९६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महापालिका क्षेत्र ५.९५ टक्के तर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

![]()















