• Latest
  • Trending
कॉग्रेस सेवा दलाच्या दुर्बिणीतून नाशिकच्या समस्या

कॉग्रेस सेवा दलाच्या दुर्बिणीतून नाशिकच्या समस्या

September 12, 2024
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

कॉग्रेस सेवा दलाच्या दुर्बिणीतून नाशिकच्या समस्या

YOU MAY ALSO LIKE

अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

ठरलं तर….या दिवशी पहिले ‘शाही स्नान’

चार फूट दुर्बिणीच्या माध्यमातून चला शोधू या स्मार्ट नाशिक… अनोखे आंदोलन

नाशिक : शहरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कॉग्रेस सेवा दलाच्या वतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले. चार फूट दुर्बिणीच्या माध्यमातून “चला शोधू या स्मार्ट नाशिक” या उपक्रमाद्वारे गांधीगिरी करण्यात आली . स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठा गाजावाजा करत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना नाशिककरांना मात्र अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे .तंत्रज्ञानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे यांत्रिक झाडू महानगरपालिकेने घेतले ते धूळ खात पडून आहेत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली संपूर्ण नाशिककरांना वेठीस धरले जात आहे .रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने काही जणांना आपले जीव गमवावे लागले.कोट्यवधी रुपये खर्चून देखील रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत.त्यामुळे हा पैसा जातो तरी कुठे असा देखील प्रश्न कॉग्रेस सेवा दलाच्या वतीने आंदोलनात उपस्थित करण्यात आला.नमो गोदा प्रकल्पाच्या नावाने मोठा खर्च झाला तरी गोदावरी नदी प्रदूषण मुक्त झाली नाही. शहरात सुरू होणारी नॅनो मेट्रो अद्याप सुरू झालेली नाही. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावता ते थेट गोदा नदीच्या पात्रात सोडले जाते. शहरातील वीज तारा भूमिगत करण्याच्या नावाखाली अनेक वर्षांपासून काम सुरू आहे परंतु परिस्थिती आहे तशीच आहे. या व अश्या अनेक समस्या नाशिककरांना भेडसावत आहेत. याकरता कॉग्रेस सेवादलाच्या वतीने आज अनोखे आंदोलन राबविण्यात आले.अशा अनेक समस्या नाशिक शहरवासीयांना पडल्या असून याकरताच नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या या गांधीगिरी मार्गाने केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड व नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी केले हे आंदोलन पंचवटी येथील निमानी बसस्थानकात करण्यात आले या आंदोलनात नाशिककर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, माजी नगरसेवक राहूल दिवे, माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे, नाशिक शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर, संतोष जाधव, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, पंचवटी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष उद्धव पवार, नाशिक शहर महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वाती जाधव, संदीप शर्मा, भालचंद्र पाटील, सिद्धार्थ गांगुर्डे, संदीप वाघ, संतोष शेवाळे, पोपटराव नागपुरे, अरुण दोंदे अनिल बहोत, ज्ञानेश्वर चव्हाण, गौरव सोनार, अल्तमस शेख संतोष हिवाळे, दत्ता कासार, उमेश चव्हाण, वंदनाताई पाटील राजकुमार जेफ, जयेश पोकळे, अण्णा मोरे, गुड्डी खान, जगदीश वर्मा, फारुख मन्सुरी, उमेश दासवानी, रामदास लोखंडे, शहबाज मिर्झा, लहू जाधव, राजीव घोलप आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .मुख्य म्हणजे नाशिक शहरात पडलेल्या खड्यांवर मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू असून काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या भाजपा आमदारांनी मनपा आयुक्तांना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता तर ठाकरे गटाच्या शिवसेनेने नाशिकरोड परिसरात मोठे आंदोलन केले होते. मनसेने देखील रस्त्यावर उतरत आंदोलन केले. त्यानंतर आता कॉग्रेसने आंदोलन केले असून प्रशासनाला कितपत जाग येते ते येत्या काही दिवसात दिसेलच.

स्मार्ट सिटी व मनपाकडून कोट्यावधींचे कामे सुरू आहेत,प्रत्यक्षात नागरिकांना सोई-सुविधाऐवजी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुर्बिणीच्या माध्यमातून विकास कसा दिसतो हे शोधले वसंत ठाकूर-कॉग्रेस सेवा दल शहराध्यक्ष

Loading

ShareTweet
Previous Post

डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे !

Next Post

गोळीबार प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या मुलाचे नाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White