• Latest
  • Trending
गोळीबार प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या मुलाचे नाव

गोळीबार प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या मुलाचे नाव

September 16, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

गोळीबार प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या मुलाचे नाव

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

आरोप-प्रत्यारोपामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ

नाशिक : लोकसभा निवडणूका संपल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांना काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना नाशिक शहरात राजकीय कुरघोडीना सुरवात झाली आहे. अडीच वर्षांपूर्वी रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे पदाधिकारी अँड प्रशांत जाधव यांच्यावर अंबड परिसरातील उपेंद्रनगर भागात गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये जाधव जखमी झाले होते. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा पोलीस तपास करत असताना गुंडाविरोधी पथकाने आकाश आनंदा सुर्यतळ (24 रा. नाशिकरोड, पंचशील नगर) श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या, सनी पगारे उर्फ टाक्या ( रा. उपनगर ) यांना अटक केली. त्यांनी मयूर बेद याच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर मयूर बेद, अंकुश शेवाळे, प्रसाद शिंदे यांना अटक करण्यात आली. यातील अंकुश शेवाळे ,प्रसाद शिंदे यांची दीपक बडगुजरसोबत जवळीक असल्याचे समजते. पोलीस चौकशीत संशयित अंकुश शेवाळे हा मयूर बेद याला पैशांचा पुरवठा करत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत मयूर बेद याला पुण्याच्या चाकण परिसरातून ताब्यात घेतले. यादरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबड पोलिसांनी अंकुश शेवाळे व मयूर बेद यांची समोरासमोर चौकशी केली यावेळी त्यांनी दीपक बडगुजर यांनी प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार करण्यासाठी सुपारी दिल्याची कबुली दिली. मात्र अँड प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला का करण्यात आला याचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. मुख्य म्हणजे दीपक बडगुजर हे ठाकरे गटाच्या शिवसेनेचचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र आहेत.

पोलिसांवर मारहाणीचा आरोप– अंकुश शेवाळे व प्रसाद शिंदे या दोघांची कोठडी संपल्याने अंबड पोलिसांकडून न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता अंकुश शेवाळे याने न्यायालयात अंबड पोलिसांवर मारहाण केल्याचा आरोप केला. बडगुजर यांचे नाव घेण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकून मारहाण केल्याचे न्यायालयात सांगितले यामुळे न्यायालयाने गंगापूर पोलिसांना अंकुशचा ताबा घेत वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले, गंगापूर पोलिसांनी अंकुशचा शासकीय रुग्णालयात घेऊन जात वैद्यकीय तपासणी करून पुन्हा अंबड पोलिसांच्या हवाली केले. राजकीय हेतूने कारवाई- सुधाकर बडगुजर पोलीस प्रशासनाकडून ताब्यात घेतलेल्याना मारहाण करण्यात आली. आमच्या कुटूंबियांचे नाव घेण्यासाठीच ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप बडगुजर यांनी केला असून आमचा न्यायदेवतेवर विश्वास असल्याचेही बडगुजर म्हणाले.लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील आम्हाला त्रास देण्याचे काम करण्यात आले होते. संजय राऊत यांचा गंभीर आरोप -आमचे सुधाकर बडगुजर हे निवडणूक लढवत असल्याने त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात गुंतविन्यासाठी तीन वर्षांपूर्वीची केस उकरून काढण्यात आली आहे.कोणावर तरी गोळीबार झाल्याचे म्हणतात त्यातील आरोपींना पकडून बेदम मारहाण करून त्यांच्या तोंडी बडगुजर कुटूंबियांचे नाव घेण्यासाठी नाशिकचे पोलीस दबाव आणत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष – सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारे कोणीही आक्षेपार्ह मेसेज पसरविल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला असून, सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Loading

Previous Post

कॉग्रेस सेवा दलाच्या दुर्बिणीतून नाशिकच्या समस्या

Next Post

उद्या लाडक्या बाप्पाला निरोप, महापालिका प्रशासन सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White