मुख्य मिरवणूक मार्गावर प्रवेश बंद, वाहतूक शाखेकडून मार्गात बदल

नाशिक: उद्या होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी महागरपालिकेने जय्यत तयारी केली असून गणेश विसर्जनासाठी भाविकांना श्री गणेशाचे विसर्जन करता यावे याकरिता दरवर्षी नैसर्गिकसह कृत्रिम तलावाची व्यवस्था करून दिली जाते यावर्षी देखील गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून सहाही विभागात 40 नैसर्गिक तर जलप्रदूषण टाळण्यासाठी 41 कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक विसर्जनासाठी गोदावरी किनारी मोठ्याप्रमाणात गर्दी करतात. दरम्यान महापालिका प्रशासनाने ठीकठिकाणी कृत्रिम तलावाच्या माध्यमातून मूर्ती दान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

वाहतुकीत बदल– लाडक्या गणरायाला भक्तांना निरोप देता यावा या उद्देशाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतुकीचे व्यवस्थापन केले आहे. काही प्रमुख मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आल्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची मुख्य मिरवणूक सकाळी 10 वाजता वाकडी बारव (चौकमंडई) पासून पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणार आहे. या मार्गावर नो-एन्ट्री– चौकमंडई -दादासाहेब फाळके रोड- महात्मा फुले मंडई- दूध बाजार- शहीद अब्दुल हमीद चौक- भद्रकाली- बादशाही कॉर्नर- गाडगे महाराज पुतळा चौक- मेन रोड- धुमाळ पॉईंट- रेड क्रॉस सिग्नल -एमजी रोड मार्गे मेहेर सिग्नल -अशोक स्तंभ- नवीन तांबट गल्ली- रविवार कारंजा होळकर पुलावरून मालेगाव स्टॅन्ड -पंचवटी कारंजा मालवीय चौक -परशुराम पुरिया चौक- कपालेश्वर मंदिर- भाजी बाजार म्हसोबा पटांगण- असा मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. या मार्गावर येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील वाहतूक सकाळी दहा वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे असे अधिसूचनेत म्हटले आहे.

![]()












