• Latest
  • Trending

नाशिकमध्ये सर्वात मोठा “जीएसटी” घोटाळा उघड

September 9, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमध्ये सर्वात मोठा “जीएसटी” घोटाळा उघड

YOU MAY ALSO LIKE

अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

ठरलं तर….या दिवशी पहिले ‘शाही स्नान’

प्रत्यक्ष विक्री न करता जीएसटीची बनावट बिले देत केंद्र शासनाची 28 कोटींची फसवणूक

नाशिक :  नाशकात पुन्हा एकदा कोट्यावधीचा जीएसटी घोटाळा उघड झाल्याने खळबळ उडाली असून काही वर्षांपूर्वी भंगार व्यावसायिकांनी बनावट जीएसटी बिले देत शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला होता. याच प्रकाराची पुनरावृत्ती नाशिकमध्ये घडली असून  एका सिमेंट विक्रेत्याने प्रत्यक्ष विक्री न करता जीएसटीची बनावट बिले देत केंद्र शासनाची तब्बल 28 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन न करता देण्यात आलेल्या बिलांवर टॅक्स इनपुट क्रेडिट (कर माफीचा फायदा) घेतला जात असल्याचे समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला केंद्रीय जीएसटी विभाग आणि उत्पादन शुल्क विभागातर्फे सहा महिन्यांपासून सुरु असलेला बनावट पावत्यांच्या चौकशीचा प्रवास नाशिकपर्यंत येऊन थांबला आणि चौकशीला सुरवात झाली या चौकशीत संशयिताने कोणत्याही प्रकारच्या मालाची विक्री न करता बिले दिल्याचे तपासात आढळून आले. संशयित व्यापारी वसीउल्ला चौधरी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून या प्रकरणाची व्याती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकारामध्ये प्रत्यक्ष वस्तू न विकता सीजीएसटी कायदा 2017 मधील तरतुदींचे उल्लंघन केले जात होते. यातून सुमारे 27 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे केंद्रीय जीएसटी विभाग आणि सेंट्रल एक्साईज यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.  झडतीत महत्वपुर्ण दस्तऐवज हाती नाशिकच्या अँटी इव्हेशन  विंगच्या अधिकाऱ्यांनी संशयीताशी संबंधित अथर्व ट्रेडर्स आणि वसीउल्ला रहेमतूल्ला चौधरी यांच्याशी संबंधित इतर व्यक्तींच्या ठिकाणांची झडती घेतली असता त्यात महत्वपूर्ण दस्तऐवज हाती लागल्याने चौधरी यांच्यावर 27.81 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतांपर्यंत पोहोचण्यासाठी “एआयची” मदत सापडलेल्या बिलांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांत याची व्याप्ती असल्याची शक्यता तपास पथकातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे अँटी इव्हेशन शाखेने एआयची मदत घेतली. एआयच्या सापळ्यात या फसव्या बिलांपैकी एक बिल आले आणि तपास सुरू झाला.
या प्रकारात बिलाचा क्रमांक टाकल्यानंतर त्यातून त्यासंदर्भात व्यवहारांची माहिती उघड होते. त्यातील एका बिलावर दाखविलेला नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे, तसेच दाखविण्यात आलेला कर भरला न गेल्याचे दिसल्यानंतर त्याबाबत तपास सुरू झाला आणि हा घोटाळा उघड झाला.

Loading

Previous Post

नाशिकच्या आई-मुलीचा रुद्रावतार ! भररस्त्यात छेड काढणाऱ्यांना चोपले

Next Post

योगेश्वरी जेजुरकर हिचे जलतरण स्पर्धेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White